Shetkari Yojana 2023 : केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी कायमच धोरणात्मक निर्णय घेत असते. या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न होत असतात. शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळावे यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील राज्य शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या विकासासाठी, त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेतले होते. वेगवेगळे योजना गेल्या सरकारने सुरू केल्या होत्या.
यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा देखील समावेश होता. या योजनेच्या माध्यमातून गेल्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता. शिवाय या योजनेअंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. याची अंमलबजावणी मात्र वर्तमान शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. 2017 18, 2018 19 आणि 2019 20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्ष ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतच प्रोत्साहन अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिल जात आहे. सातारा जिल्ह्यात योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख 77 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
यासाठी 628.31 कोटी रुपये शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. मात्र दोन लाख 723 शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जिल्ह्यात एकूण चार लाख पाच हजार २८० खाती नोंदणीकृत झाली आहेत. त्यापैकी दोन लाख १७ हजार ५४८ खात्यांना सहकार विभागाने विशिष्ट खाती क्रमांक दिली आहेत. अर्थातच या शेतकऱ्यांची प्रोत्साहन पर अनुदानाच्या यादीमध्ये नावे आली आहेत. यापैकी जवळपास दोन लाख १४ हजार ८१६ खात्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर दोन हजार ७२३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही.
दरम्यान या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करण्याची सूचना आणि आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे. केवळ आधार प्रामाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावे आणि अनुदान प्राप्त करावे असे आवाहन केले जात आहे.