मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट ! मे महिन्यात सुरु होणार ‘हा’ महत्वाचा बोगदा; एका तासाचा प्रवास आता केवळ 10 मिनिटात, पहा…..

Published on -

Mumbai Goa Expressway : मुंबई गोवा महामार्ग कोकणातील जनतेसाठी अति महत्त्वाचा महामार्ग आहे. या मार्गाचे काम मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून अद्यापही या महामार्ग अंतर्गत येणारी बहुतांशी कामे बाकी आहेत. दरम्यान आता या मार्गाबाबत एक मोठी माहिती हत्ती आली आहे. खरं पाहता मुंबई गोवा महामार्ग चाकरमान्यांसाठी अति महत्त्वाचा आहे.

या मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे अशी प्रवाशांची इच्छा आहे. मात्र तांत्रिक अडचणी आणि ठेकेदारांचा कामचुकारपणा तसेच प्रशासनाची उदासीनता यामुळे या मार्गाचे काम अतिशय कासव गतीने सुरू आहे. मात्र आता या मार्ग अंतर्गत येणारा एक महत्त्वाचा टप्पा मे महिन्यात सुरू होणार आहे.

हे पण वाचा :- सोलापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ रिक्त पदासाठी भरती सुरू; दहावी पास करू शकणार अर्ज, पहा डिटेल्स

या मार्गावरील सर्वात मोठा बोगदा अर्थातच कशेडी घाटातील बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून हाच बोगदा आता मे महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सांगितले जात आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, कशेडी घाटात एकूण दोन बोगदे तयार केले जात आहेत. कशेडी बोगदा तीन पदरी असून यापैकी एक बोगदा आता मे महिन्यात सुरु होणार आहे.

मुंबईच्या बाजूने जाणाऱ्या बोगद्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून एप्रिल महिन्यापर्यंत उर्वरित 20 टक्के काम पूर्ण होणार अशी शक्यता आहे. त्यामुळे हा मुंबईच्या बाजूने जाणारा बोगदा मे महिन्यात खुला केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे याला महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 70,000 ; ‘या’ तारखेपर्यंत करावा लागणार अर्ज

यामुळे मे महिन्यात कशेडी घाटातील एक बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कशेडी ते रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भोगाव इथपर्यंत कशेडी बोगदा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा बोगदा 2 किलोमीटरचा असून यामुळे एक तासाचे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; सोयाबीन दरात वाढ होणार का? पहा काय म्हणताय तज्ञ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe