Vodafone-Idea : Vi ने आणले तगडे प्लॅन! ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मिळणार अनेक सुविधा

Published on -

Vodafone-Idea : सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक इंटरनेट प्लॅन लाँच करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, Vodafone Idea कडे अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत जे वेगवेगळ्या किंमतींच्या श्रेणींमध्ये तसेच वेगवेगळ्या फायद्यांसह येतात.

अशातच आता या कंपनीने आपला असाच एक रिचार्ज प्लॅन आणला आहे. जो तुम्‍हाला जास्तीत जास्त बेनेफिट्स देण्‍यासोबतच अतिशय स्वस्तात मिळत आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह अनेक सुविधा दिल्या जात आहेत.

699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Vodafone-Idea च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2 कनेक्शन मिळत आहे. तसेच, यात तुम्हाला फक्त एकासाठी पैसे द्यावे लागणार आहे. हे लक्षात घ्या की हा फॅमिली प्लॅन आहे त्यामुळे ग्राहकांना यात 2 कनेक्शन मिळत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळत आहे. ग्राहकांना या प्लॅनमध्ये 40GB डेटा देण्यात येतो. इतकेच नाही तर 3000 एसएमएस मोफत मिळत आहेत. या सर्व सेवा दुसऱ्या क्रमांकासाठीही उपलब्ध असणार आहे.

999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Vodafone-Idea च्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण ग्राहकांना 4 कनेक्शन मिळतात. या प्लॅनमध्येही तुम्हाला फक्त एकासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीचा हा फॅमिली प्लॅन असल्याने ग्राहकांना यामध्ये 4 कनेक्शन दिली जात आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग मिळत ग्राहकांना 140GB डेटा देण्यात येतो. तर इतर 3 वापरकर्त्यांना 40GB डेटा दिला जातो. तसेच यात Amazon Prime चे 6 महिने उपलब्ध असणार आहे.

1149 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Vodafone-Idea च्या 1149 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 5 कनेक्शन मिळत आहेत.या प्लॅनमध्येही तुम्हाला फक्त एकासाठी पैसे मोजावे लागणार आहे. कंपनीचा हा फॅमिली प्लॅन असून ग्राहकांना यामध्ये 5 कनेक्शन मिळत आहेत. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. ग्राहकांना यात 140GB डेटा मिळत आहे. 40GB डेटा सर्व कनेक्शनवर उपलब्ध आहे. इतकंच नाही तर यामध्ये डिस्ने हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइमचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी उपलब्ध असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe