Ahmednagar Panjabrao Dakh : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा एप्रिल पासून राज्यात पावसाला सूरुवात होणार आहे. तसेच 7 एप्रिल पासून पावसाचा जोर वाढेल आणि 7 एप्रिल ते नऊ एप्रिल पर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.
या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे. तसेच आपले पशुधन देखील शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी बांधावे आणि अवकाळी पावसामुळे वीज पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
हे पण वाचा :- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणीसह ‘या’ जिल्ह्यात पाऊस अन गारपीट होणार…
यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर झाडाखाली थांबू नये, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन केले जात आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सात एप्रिल ते नऊ एप्रिल दरम्यान अहमदनगर, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, बीड, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चाळीसगाव, सिल्लोड, वैजापूर, भोकरदन, कोकण या भागात पावसाची शक्यता राहणार आहे.
एकंदरीत डक यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक राहणार आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना अधिक सजग राहण्याची गरज आहे.
हे पण वाचा :- जुनी पेन्शन योजनेबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! पहा काय घोषणा केली सरकारने
एकंदरीत गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यात मात्र सुरुवातीला तापमानात वाढ होत होती, यामुळे शेतकऱ्यांना आता पाऊस गेला असे वाटतं होते. मात्र आता एप्रिल महिन्यात देखील पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
दरम्यान डख यांनी 9 एप्रिल नंतर पावसाची उघडीप राहील असा अंदाज बांधला आहे. परंतु 14 एप्रिल, 15 एप्रिल, 16 एप्रिल आणि 17 एप्रिल हे चार दिवस पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे. मात्र या कालावधीत पडणारा पाऊस हा राज्यात सर्वत्र राहणार नाही तर मराठवाडा आणि विदर्भात राहील असा अंदाज आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मानधनात साडे सात हजाराची वाढ, पहा….