Investment Scheme : भारीच की! 166 रुपयांच्या बचतीतून काही वर्षांतच बनाल करोडपती, समजून घ्या गुंतवणुकीचे संपूर्ण गणित

Published on -

Investment Scheme : अनेकजण चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करतात. कमी वेळेत आणि जास्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्याला अनेकांचा कल असतो. काही योजना गुंतवणूकदारांना करोडपती तर काही योजना गुंतवणूकदारांना लखपती बनवतात.

परंतु अनेकांना गुंतवणूक कशी करावी ते माहिती नसते. त्यामुळं अनेकजण फारसा पैसा जमा करू शकत नाही. सध्या अशी एक योजना आहे ज्यात तुम्ही 166 रुपयांची बचत करून निवृत्तीच्या वेळी 1.8 कोटी रुपये मिळवू शकता. यात गुंतवणूक कशी करावी? ते जाणून घ्या.

त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एक चांगली म्युच्युअल फंड योजना निवडावी लागणार आहे. त्यात तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच, समजा जर तुम्ही दिवसाला 166 रुपयांची बचत केली आणि 30 वर्षांसाठी दरमहा 5,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.

इतकेच नाही तर, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर वर्षाला अंदाजे 12 टक्के परतावा मिळवू शकता. तुम्ही 30 वर्षांनंतर, तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी 1.8 कोटी रुपयांचा निधी सहज गोळा करू शकता.

निवृत्तीनंतर मॅच्युरिटीच्या वेळी मिळालेल्या पैशातून तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगता येणार आहे. इतकेच नाही तर आता तुम्हाला या पैशाचा वापर करून तुम्ही तुमची इतर महत्त्वाची कामेही करता येतील.

हे लक्षात घ्या की म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असून त्यामुळे यात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जर तुम्ही नकळत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आणि या स्थितीत तुम्हाला खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा बाजाराच्या वर्तणुकीवरून ठरत असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe