World Poorest Country : जगातील अनेक देश आर्थिक दृष्ट्या मजबूत होण्यासाठी आणि महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरात असे अनेक लहान-मोठे देश आहेत. आजपर्यंत तुम्ही फक्त श्रीमंत देशाबद्दल ऐकले असेल पण आज तुम्हाला जगातील सर्वात गरीब देशाबद्दल सांगणार आहोत.
जगातील बुरुंडी हा असा एक देश आहे ज्या ठिकाणी लोकांना दिवसभर काम करून ५० रुपये देखील मिळत नाहीत. या देशातील 85 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. या ठिकाणच्या लोकांना एका वेळचे जेवणे मिळणे देखील कठीण आहे.
दिवसाची कमाई एक डॉलरपेक्षा कमी
बुरुंडी हा जगातील सर्वात गरीब देश आहे. बुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील ग्रेट लेक्स प्रदेशात स्थित एक देश आहे. या ठिकाणच्या लोकांना दिवसभर काम केल्यानंतर १ डॉलर देखील मिळत नाही.
पाच दशकांपूर्वी देशाच्या निर्मितीपासून त्वा, तुत्सी आणि हुतू जमातींचे अस्तित्व कायम आहे. 1993 ते 2005 दरम्यान येथील जमातींमधील जातीय संघर्षामुळे सुमारे 2 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला.
बुरुंडी देश असा गरीब होत गेला
इंग्लड-अमेरिकेने राज्य केल्यानंतर देखील या देशाची परिस्थिती चांगली होती. पण सन १९९६ पासून परिस्थिती बदलली. या देशात 1996 ते 2005 पर्यंत मोठा वांशिक संघर्ष चालला. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून या देशाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
त्यानंतर हळूहळू या देशाची परिस्थिती इतकी बिकट होत गेली की हा देश जगभरातील गरीब देशांच्या यादीत जाऊन बसलं आहे. आणि आज हा जगभरातील सर्वात गरीब देश म्हणून ओळखला जातो.
बुरुंडीमध्ये एक डॉलरची किंमत
बुरुंडी देशात जगभरातील सर्वात गरीब लोक राहतात. या ठिकाणच्या लोकांना एका वेळचे व्यवस्थित जेवण देखील मिळत नाही. या देशातील लोकांची महिन्याची कमाई १ डॉलरपेक्षा देखील कमी आहे. या ठिकाणच्या लोकांची दिवसाची कमाई ५० रुपयांपेक्षा कमी आहे.
सध्या पाकिस्तानमध्ये एका डॉलरची किंमत २८७ रुपये आहे. दुसरीकडे, बुरुंडीची स्थिती डॉलरच्या तुलनेत वाईट आहे. येथे एका डॉलरची किंमत 2066 रुपये आहे. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.
इतर अनेक क्षेत्रातही कमकुवत
बुरुंडी हा देश आर्थिक स्थितीतच नाही तर इतर गोष्टींमध्ये देखील मागासलेला देश आहे. पूर्वी या देशावर अमेरिका आणि इंग्लंडचे राज्य होते. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची आर्थिक स्थिती खालावत गेली.
बुरुंडी या देशात 9 वर्षे विविध जमातींमध्ये लढाई सुरू होती. त्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशाची स्थिती खराब होत गेली. इथल्या लोकांना पोटभर अन्न देखील मिळत नाही. बालमृत्यूचे प्रमाणही येथे सर्वाधिक आहे. येथे प्रत्येक 1000 मुलांपैकी 88 बालकांचा जन्मावेळी मृत्यू होतो.