गोमूत्र पिल्याने काय होईल ? संशोधनात समोर आली खतरनाक माहिती !

Ahmednagarlive24
Published:

आपल्या देशात लाखो लोक आहेत जे जय हो गौ माता म्हणत गोमूत्र सेवन करतात. गोमूत्र देखील पवित्र मानले जाते. गायीचे प्रत्येक अंग पवित्र असते असे म्हणतात. भारतातील कोट्यवधी लोक ज्या गोमूत्राला पवित्र मानून शतकानुशतके पीत आहेत, ते पवित्र नाही.

नाही, नाही… हे आम्ही म्हणत नसून एका संशोधनातून हे समोर आले आहे. आता प्रश्न असा असेल की हे संशोधन कोणी केले? हे संशोधन बरेलीस्थित ICAR- Indian Veterinary Research Institute (IVRI) ने केले आहे. प्राण्यांवर संशोधन करणारी ही देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्था आहे. या संशोधनानुसार, गोमूत्रात अनेक हानिकारक जीवाणू असू शकतात, जे मानवांसाठी हानिकारक असू शकतात.

गेल्या अनेक वर्षांपासून गोमूत्राची चर्चा होत आहे. आयुर्वेदात गोमूत्र हे अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी उपाय म्हणून सांगितले आहे. कॅन्सरच्या आजारातही तो बरा होतो असे सांगितले आहे.

अशा परिस्थितीत भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे एक संशोधन समोर आले आहे, ज्यामध्ये गोमूत्र पिणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते असे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर म्हशीचे मूत्र हे गायीच्या गोमूत्रापेक्षा चांगले असल्याचेही या संशोधनात सांगण्यात आले आहे. तर, प्रथम गोमूत्र पिण्याचे तोटे जाणून घेऊया.

हे संशोधन गोमूत्राबद्दल काय सांगतं ?
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील इज्जतनगर येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत (IVRI) काही विद्यार्थ्यांनी मिळून गोमूत्रावर संशोधन केले आहे. त्यात असे म्हटले आहे की गोमूत्रात 14 प्रकारचे जीवाणू आहेत आणि त्यापैकी बहुतेक ई-कोलाई (Escherichia coli) जीवाणू आहेत.

Escherichia coli मुळे मानवांमध्ये पोटाचे संक्रमण होऊ शकते आणि ते गंभीर आजारी होऊ शकतात. या संशोधनासाठी 73 गायी आणि म्हशींचे मूत्र घेण्यात आले. यामध्ये साहिवाल, थारपारकर, विंदवी अशा अनेक गायींचा समावेश करण्यात आला. यामध्ये लघवीमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आढळून आले जे अत्यंत हानिकारक असू शकतात.

एवढेच नाही तर म्हशीचे मूत्र हे गोमूत्रापेक्षा जास्त फायदेशीर असल्याचेही संशोधनात सांगण्यात आले आहे. म्हशीच्या मूत्रात S Epidermidis आणि E Rhapontici सारखे अधिक प्रभावी जिवाणू असतात जे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe