Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांचे संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय नुकताच निर्गमित केला आहे. निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वास्तविक, हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून या निर्णयाचे स्वागत वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून यावेळी केले जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मोठी सुनामी पार पडली. माननीय न्यायालयात झालेल्या सुनावणी मध्ये सरकारी कर्मचारी निवृत्तीच्या एक दिवस आधी देखील वार्षिक वेतन वाढीचे हक्कदार असतात असा महत्त्वाचा निर्वाळा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून यावेळी देण्यात आला.
हे पण वाचा :- पंजाबरावांचा अंदाज पुन्हा ठरला खरा ! आता पुढचा अंदाज नेमका काय? केव्हा थांबणार पावसाचं थैमान, पहा पंजाब डख काय…
नेमकं प्रकरण काय?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की कर्नाटक मधील कर्नाटक पावर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी मालकी असलेल्या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका अपील म्हणजेच याचिका विरोधात हा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी पारित केला आहे.
वास्तविक कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधी देखील वेतन वाढीसाठी पात्र ठरतात असा महत्त्वाचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात कर्नाटक पावर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासाठी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात कंपनीच्या माध्यमातून टाकण्यात आली.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! एनपीसीआईएलमध्ये ‘या’ 325 रिक्त जागांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज
आता सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निकाल अथवा निर्णय अबाधित ठेवण्याचा म्हणजेच कायम ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन या कंपनीची याचिका फेटाळली आहे. यावेळी मा. सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिप्पणी देखील केली आहे. न्यायालयाने यावेळी म्हटले की, सरकारी कर्मचाऱ्यांनी वर्षभर केलेल्या चांगल्या कामाच्या आधारावर, चांगल्या आचरणाच्या आधारावर वेतन वाढ ही शासनाकडून दिली जात असते.
अशा परिस्थितीत जर कर्मचारी दुसऱ्या दिवशी निवृत्त होत असेल तरी त्यास वेतन वाढीपासून वंचित ठेवता येणार नाही. निश्चितच माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आणि टिप्पणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अति महत्त्वाची असून या निर्णयाचे सरकारी कर्मचाऱ्यांद्वारे स्वागत केले जात आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत मोठी अपडेट; शासन निर्णय निर्गमित, पहा….