Home vastu tips : वास्तुशास्त्रानुसार अनेकजण आजची घरामध्ये विशेष काळजी घेत असतात. तसेच नवीन घर बांधताना देखील ते वास्तुशास्त्रानुसार बांधले जाते. पण काही वेळा अनेकांच्या चुकीच्या सवयीमुळे घरामध्ये गरिबी येत असते. पण ही गरिबी तुम्ही घालवू देखील शकता.
घरातील वातावरण आनंददायी राहावे यासाठी अनेकजण सतत प्रयत्न करत असतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार अनेक नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे. वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत.
कुटुंबामध्ये सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेल्या नियमांचा उपयोग होऊ शकतो. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुम्हालाही महागात पडू शकते.
घरामध्ये सुख- शांती आणि आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील. जर तुम्ही खालील गोष्टीचे अनुकरण केल्यास तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थिती सुधारेल आणि सुख शांती देखील लाभेल.
घरामध्ये वास्तूशी संबंधित नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे
घरातील मुख्य दरवाजाच्या पुढे किंवा आसपास कचऱ्याचा ढीग टाकू नका. तसेच घराबाहेर विटा आणि सिमेंटचे ब्लॉक देखील लावू नका. असे केल्याने तुमची प्रगती थांबेल आणि आर्थिक स्थिती ढासळेल.
तुम्ही घरामध्ये लावलेले आकाशकंदील, खिडक्या, दरवाजे हे कधीही तुटलेल्या स्थितीमध्ये ठेऊ नका. असे केल्यास तुमच्या घरातील गुप्त गोष्टी बाहेर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला यश मिळत नाही. तसेच कुटुंबातील नात्यात देखील दुरावा येत असतो.
घरामधील सर्व कोपरे सतत स्वच्छ ठेवा. या ठिकाणी कधीही कचरा होऊ देऊ नका. जर तुम्ही असे केल्यास कुटुंबतील सदस्यांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.
तुमच्या घरातील मुख्य दरवाजा आवाज करत असेल तो वेळीच बदलून घ्या. मुख्य दरवाजा वाजल्याने तुमच्या घरामध्ये आरोग्याशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे दरवाजा वाजत असेल तर तो लगेच बदलून घ्या.
तुमच्या घराचा डस्टबिन नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा, चुकूनही डस्टबिन उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका, नाहीतर तुमच्या घरात गरिबी राहते. त्यामुळे तुम्ही नेहमी घरामध्ये डस्टबिन ठेवताना योग्य दिशेला ठेवावी.