Tata Share Market : टाटा कंपनी भारतात एक विश्वासाचे नाव आहे. यामुळे टाटा समूहाच्या स्टॉकमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कायमच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. विश्वसनीय कंपनी म्हणून गुंतवणूकदारांचा टाटा समूहावर मोठा विश्वास आहे. विशेष बाब म्हणजे टाटा समूहाच्या स्टॉक कडून गुंतवणूकदारांना भरभरून असा लाभही मिळत आहे.
टाटा समूहाच्या अशाच एका स्टॉकपैकी एक आहे टीसीएसचा स्टॉक. या टीसीएसच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या दहा लाखाचे दहा कोटी करून दिले आहेत. यामुळे टीसीएस मध्ये गुंतवणूक करणारे काही वर्षातच करोडपती बनले आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की दहा लाखाचे दहा कोटी कसे झाले असतील? चला तर मग जाणून घेऊया यामागील गणित. वास्तविक, 2009 मध्ये टाटाच्या टीसीएस कंपनीचे शेअर मात्र 118 रुपये आणि 49 पैशांवर ट्रेड करत होते.
हे पण वाचा :- खुशखबर ! मुंबईहुन सुटणाऱ्या ‘या’ सुपरफास्ट ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळणार; पहा…
अशा परिस्थितीत त्यावेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने दहा लाख रुपये गुंतवणूक केले असतील 8430 शेअर मिळाले असतील. तसेच टीसीएस ने जुन 2019 आणि मे 2018 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर देखील दिले आहेत. म्हणजे दहा लाख रुपये गुंतवणूक करून आत्तापर्यंत होल्ड करून ठेवलेल्या गुंतवणूकदाराकडे तब्बल 33 हजार 720 शेअर TCS चे असतील.
आता टीसीएसचे शेअर 13 एप्रिल 2023 रोजी 3189 रुपये आणि 85 पैशावर ट्रेड करत होते. म्हणजेच जर 2009 मध्ये दहा लाख रुपये गुंतवणूक करून टीसीएस चे शेअर एखाद्या व्यक्तीने होल्ड करून ठेवले असतील तर अशा व्यक्तीला आता दहा कोटी रुपय टीसीएसच्या शेअर मधून मिळणार आहेत.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! राज्य कर्मचारी पुन्हा जाणार संपावर; ‘या’ मुख्य मागणीसाठी कर्मचारी पुन्हा उपसणार संपाच हत्यार, पहा….
म्हणजे 2009 पासून ते आत्तापर्यंत टीसीएसच्या शेअरने 2500% इतके रिटर्न्स आपल्या गुंतवणूकदारांना दिले आहेत. निश्चितच लॉंगटर्ममध्ये टीसीएसच्या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे मात्र गेल्या एका वर्षापासून हा शेअर घसरला आहे. हा शेअर एका वर्षात 9.53% घसरला आहे. परंतु या शेअरने सातत्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
मित्रांनो येथे दिलेली माहिती ही सामान्य माहिती म्हणून देण्यात आली आहे. हा गुंतवणूकदारांसाठी कुठल्याही परिस्थितीत वित्तीय सल्ला राहणार नाही. कोणत्याही शेअरमध्ये किंवा स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराने आपल्या वित्तीय सल्लागाराशी चर्चा करणे अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर ! ‘या’ सरकारी बँकेत निघाली मोठी भरती; आजच करा इथं अर्ज, पहा…