अहमदनगर Live24 , 28 एप्रिल 2020 :- अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या ५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा होती.
त्यापैकी २ अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत.
#CoronaUpdates#अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या ०५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यापैकी ०२ अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत.@_Rahuld @bb_thorat @mrhasanmushrif @GadakhShankarao @prajaktdada @NagarPolice @MahaDGIPR @MahaHealthIEC pic.twitter.com/G1Sh2PoYgJ
— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) April 28, 2020
‘या’ 3 तालुक्यातच राहिले कोरोना रुग्ण, बाकी अहमदनगर जिल्हा करोनामुक्त !
जिल्ह्यात आजवर 43 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 24 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात करोनाबाधित एकूण 17 रुग्ण असून हे सर्व बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
त्यात जामखेड तालुक्यातील 11, संगमनेरमधील चार, तर नेवाशाती दोन रुग्णांचा समावेश आहे. जामखेड, संगमनेर, नेवासे वगळता जिल्हा करोना मुक्त झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी, राहुरी, अकोले तालुक्यात तर एकही रूग्ण अद्यापपर्यंत आढळलेला नाही.