अहमदनगर ब्रेकिंग :पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- रविवारी दुपारी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी  गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

स्थानिक नागरिकांच्या मदतीने ६३ तासानंतर मंगळवारी (२८ एप्रिल) सकाळी मृतदेह शोधण्यात यश आले.

संगमनेर शहरानजीकच्या फादरवाडीजवळ असलेल्या वाटीच्या डोहामध्ये या युवकाचा मृत्यू झाला.

अनिल गुलाब मेहेत्रे (वय ४०, रा. मेहेत्रे मळा, जोर्वे रोड) असे या युवकाचे नाव असून

रविवारी दुपारी तो आपल्या तिघा चुलत भावांसह पोहण्यासाठी नदीवर गेला होता.

माहिती मिळताच पोलिसांनी पोहणाऱ्या २० युवकांच्या मदतीने नदीपात्रात अनिलचा शोध सुरू केला होता.

रविवारी व सोमवारी त्याचा निंबाळे, रायते, वाघापूर शिवारातील नदीपात्रात शोध घेतला.

पण, तो सापडला नाही. मात्र, मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह, तो जेथे बुडाला त्याच परिसरात आढळून आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment