Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy

EPFO Balance : मस्तच! आता विना इंटरनेट तपासता येणार पीएफ शिल्लक रक्कम, जाणून घ्या ४ सोप्या पद्धती

Saturday, April 22, 2023, 2:13 PM by Ahilyanagarlive24 Office

EPFO Balance : सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असताना अनेक कर्मचाऱ्यांची पगारातील काही टक्के रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना निधीमध्ये कापली जाते. याचा कर्मचाऱ्यांचा निर्ववृत्तीनंतर फायदा मिळत असतो. तसेच काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम तपासायची असते.

मात्र कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम कशी तपासायची हे माहिती नसते. पण आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कर्मचाऱ्यांना पीएफ तपासण्यासाठी अनेक सोपे मार्ग आणले आहेत. त्याद्वारे कर्मचारी सहज पीएफ शिल्लक रक्कम तपासू शकतात.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून आता नुकतेच 2022-2023 EPF ठेवींवरील व्याजदर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग या योजनेत गुंतवणूक करून त्यावरील व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. सध्या EPF ठेवींवर 8.15 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

कर्मचारी वर्ग या योजनेमध्ये अधिक पैसे देखील गुंतवू शकतात. कर वाचवायचा असेल तर कर्मचारी वर्षांमध्ये किमान ५०० ते कमाल १.५ लाख रुपये गुंतवू शकतात. त्यामुळे कर्मचारी वर्गाला कर भरण्यापासून थोडीशी बचत देखील होऊ शकते.

इंटरनेटशिवाय पीएफ शिल्लक तपासण्याचे २ मार्ग

SMS

UAN-सक्रिय वापरकर्ते नोंदणीकृत मोबाइल फोनवरून 7738299899 वर एसएमएस पाठवून त्यांचे सर्वात अलीकडील पीएफ योगदान आणि EPFO ​​कडे उपलब्ध शिल्लक तपासू शकतात.

मिस्ड कॉल

एखाद्या सदस्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 9966044425 वर मिस्ड कॉल देऊन, त्याने UAN वेबसाइटवर नोंदणी केली असल्यास त्याला त्याच्या EPFO ​​खात्याची माहिती मिळेल.

इंटरनेटद्वारे तपासण्याचे दोन मार्ग

EPFO पोर्टल

सदस्य ई-सेवा साइटवर तुमचा UAN नंबर आणि पासवर्डसह EPFO ​​साइट epfindia.gov.in वर लॉग इन करून तुम्ही तुमचे स्टेटमेंट ऍक्सेस करू शकता. याद्वारे तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यावरील शिल्लक रक्कम किती आहे हे समजेल.

उमंग अॅप

तुमची शिल्लक तपासण्यासाठी तुम्ही उमंग प्लॅटफॉर्मवर ईपीएफओ अॅप वापरू शकता. या अॅपद्वारे तुम्ही सहज पीएफ खात्यावरील शिल्लक रक्कम तपासू शकता. घरबसल्या तुम्ही या वरील ४ मार्गानी पीएफ शिल्लक रक्कम सहज तपासू शकता.

Categories भारत, आर्थिक, ताज्या बातम्या Tags EPF, EPF News, EPFO, EPFO Balance, PF Account Balance, Umang App
महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजनेसाठी एक पाऊल पडले पुढे ! OPS योजनेबाबत झालं ‘हे’ महत्वाचं काम, वाचा सविस्तर
Summer Car Care Tips : उन्हाळ्यात कार चालवताना या गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा तुमची कार पडेल बंद…
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress