Best Summer Destinations In India : या उन्ह्याळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील ही थंड खास ठरू शकतात. कारण सध्या उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे आणि अनेकांना सुट्ट्या लागली असल्याने फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात.
पण तुम्हाला फिरण्यासाठी भारतातील हिल स्टेशन या दिवसांत फायद्याची ठरू शकतात. कारण भारतातील अनेक सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या दिवसांत हिल स्टेशनला भेट देणेच तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.
भारतात अशी काही थंड हवेची ठिकाणे आहेत त्यांना भेट देऊन तुम्ही तुमची सहल अविस्मरणीय बनवू शकता. तसेच हिल स्टेशनला तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता.
चेरापुंजी
जर तुम्हाला उष्णतेपासून थोडे दिवस सुटका हवी असेल तर तुम्ही चेरापुंजी या थंड पर्यटन ठिकाणी भेट देऊ शकता. या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडत असतो. या ठिकाणचे तापमान 15 अंश ते 23 अंशांपर्यंत राहते. येथील धबधबे सर्वांचे आकर्षण ठरतात. या ठिकाणी स्वच्छ आणि शांत परिसर पाहायला मिळेल.
कुन्नूर
तामिळनाडूमधील कुन्नूर हे एक अतिशय प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या ठिकाणचा परिसर अतिशय शांत आणि सुंदर आहे. त्यामुळे लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. चहाच्या बागांसह, तुम्ही निलगिरी रेल्वे मार्गावर फिरू शकता. इथल्या रिसॉर्टमध्ये बसून बाहेरचं नजारा पाहणं सुद्धा मनमोहक आहे.
तवांग
तवांग हे देखील भारतातील सर्वात कमी तापमान असलेले पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्हाला सुंदर मठ आणि विलोभनीय नैसर्गिक दृश्ये पाहायला मिळतील. शांत आणि सुंदर नैसर्गिक पर्यटन स्थळाचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी तवांग हे एक खास पर्यटन स्थळ आहे.
मिरिक
पश्चिम बंगालमधील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या मिरिक या हिल स्टेशनला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत सहलीचे काही दिवस घालवू शकता. उन्हाळ्यात या ठिकाणचे तापमान २० अंशाच्या वर कधीही जात नाही. तुम्ही या ठिकाणी थंड हवा आणि सुंदर नैसर्गिक पर्यटन स्थळांचा आनंद घेऊ शकता.