Tunwal Sport 63 Mini : दमदार इलेक्ट्रिक बाइक ! 50 हजारांपेक्षा कमी किंमत आणि रेंज 70 किमी; जाणून घ्या तगडे फीचर्स

Published on -

Tunwal Sport 63 Mini : देशात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा वेळी लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. जर तुम्हीही भारतीय बाजारपेठेत एका स्वस्त व प्रवासाला परवडणाऱ्या बाइकची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.

कारण भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत कमी किमतीच्या ई-बाईकला जास्त मागणी आहे. Tunwal Sport 63 Mini ही बाजारपेठेतील एक शक्तिशाली ई-बाईक आहे. ही ई-बाईक एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 70 किमी पर्यंत धावते. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा वीणा खर्च तुम्ही प्रवास करू शकता.

सुरक्षिततेसाठी दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक

या ई-बाईकमध्ये 48 V/26 Ah बॅटरी पॅक देण्यात आला आहे. त्यात BLDC मोटर आहे. तसेच सुरक्षेसाठी याच्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. यात ट्यूबलेस टायर आणि डिजिटल कन्सोल मिळतात. टुनवाल स्पोर्ट 63 मिनी 49,990 हजार रुपयांना उपलब्ध आहे.

ही स्लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर

ही बाइक चालवण्यासाठी नोंदणी आणि वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक नाही. ही स्लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ज्याला कमी वजन आणि स्टायलिश डिझाइन देण्यात आले आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, साधारण चार्जरने ते सुमारे 5 तासांत पूर्णपणे चार्ज होते. यात डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, पुश बटन स्टार्ट, ईबीएस, एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News