युवा शेतकऱ्याचा वांग्याच्या शेतीतला हटके प्रयोग; ‘या’ जातीच्या वांगी लागवडीतून मिळवले एकरी आठ लाखांचे उत्पन्न, पहा….

Success Story : गेल्या काही दशकांपासून शेती व्यवसाय अतिशय आव्हानात्मक बनला आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना फारसं उत्पन्न मिळत नाहीये. अशा परिस्थितीत शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करण्याचा सल्ला दिला जात आहे. काही शेतकरी असे बदलही करत आहेत आणि चांगले उत्पन्न देखील मिळवत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवत लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे. जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील सुदर्शन जाधव या युवा शेतकऱ्याने भाजीपाला पिकाच्या शेतीतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे. सुदर्शन यांनी वांग्याच्या शेतीतून मात्र एका एकरात आठ लाखांचे उत्पन्न करून दाखवले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी उसाच्या पिकातून देखील दर्जेदार उत्पादन मिळवले आहे.

हे पण वाचा :- अरे बापरे! भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा; उद्यापासून ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस !

भाजीपाला आणि उसाच्या पिकातून त्यांना दरवर्षी सहा एकर जमिनीतून जवळपास 12 लाखांपर्यंतची कमाई होते. यामध्ये मात्र वांग्याच्या शेतीचा मोठा वाटा आहे. एका एकरात वांग्याची लागवड करून सुदर्शन जाधव हे या पिकातून तब्बल आठ लाखांपर्यंतची कमाई करत असतात. सुदर्शन सांगतात की 2011 पूर्वी त्यांचे वडील आणि काका पारंपारिक पिकांची शेती करायची. यामध्ये ऊस सोयाबीन भुईमूग यावरच त्यांचा मदार होता.

मात्र 2011 पासून शेतीची जबाबदारी सुदर्शन यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि परिवाराने सुदर्शन यांना मोलाची साथ दिली. वास्तविक बीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुदर्शन यांनी नोकरी ऐवजी शेती व्यवसायाला निवडले आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याच्याकडे वडिलोपार्जित सात एकर बागायती आणि दोन एकर कोरडवाहू जमीन. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो काळजी घ्या; ‘या’ भागात आजपासून तुफान गारपीट होणार ! पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

या सात एकर शेत जमिनीमध्ये त्यांनी दोन एकरमध्ये भाजीपाला पिकाची शेती सुरु केली तर एका एकरात विहीर तयार केली. उर्वरित चार एकर मध्ये ते उसाची शेती करत असतात. सुदर्शन सांगतात की त्यांनी दोन एकर शेतीमध्ये वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची आतापर्यंत शेती केली आहे. यामध्ये एक एकरावर ते गॅलियन या जातीच्या वांग्याची शेती करतात.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते गॅलियन या जातीची शेती करत असून एका एकरातून त्यांना जवळपास 40 टन पर्यंत मान मिळत आहे. या जातीची वांग्याची लागवड झाल्यानंतर पुढील 70 दिवसात उत्पादन मिळते आणि उत्पादन सुरू झाल्यानंतर तब्बल तीन ते चार महिने यापासून वांगी मिळत राहतात. 

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; यंदा ‘असा’ राहणार पावसाळा, ‘या’ महिन्यात पडणार खूपच कमी पाऊस? वाचा सविस्तर

ते सांगतात की या वांग्याला 20 ते 30 रुपये बाजारात दर मिळतो. या वांग्यांना गोवा बेळगाव मुंबई यांसारख्या शहरात मोठी मागणी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ही वांगी विशेषता भरीत करण्यासाठी तसेच मांसाबरोबर खाण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे याला बाजारात चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ते सांगतात की गॅलियन जातीची वांगी उत्पादित करण्यासाठी एकरी त्यांना दोन लाखाचा खर्च येतो. यापासून जवळपास आठ लाखांचे उत्पन्न त्यांना मिळत म्हणजेच खर्च वजा जाता सहा लाखाचा निव्वळ नफा त्यांना राहतो. निश्चितच गॅलियन जातीच्या वांग्याच्या शेतीतून एकरी आठ लाखांचे उत्पन्न मिळवून या युवा शेतकऱ्याने इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.

हे पण वाचा :- पुणे-औरंगाबाद ग्रीनफील्ड महामार्ग; ‘या’ 4 जिल्ह्यातील 122 गावांमध्ये होणार भूसंपादन; जमिनीला मिळणार सोन्याचा भाव, पहा कुठवर आलं काम?