22 वर्षीय युवा शेतकऱ्याचा प्रयोग ! आठ एकरात मिरचीची शेती सुरू केली, झाली 50 लाखांची कमाई; वाचा ही यशोगाथा

Successful Farmer : गेल्या काही दशकांपासून विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे सातत्याने येणारी नापीकी यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे मत काही तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र आता येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून आपल्या प्रयोगातून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधत आहे. यामुळे विदर्भात आता शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होईल अशी आशा आहे.

वास्तविक विदर्भ हा धान उत्पादन तसेच सोयाबीन आणि कापूस लागवडीसाठी विशेष ओळखला जातो. येथील बहुतांशी जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाची प्रामुख्याने लागवड केली जाते. काही जिल्ह्यात धान म्हणजेच भात पिकाची देखील मोठ्या प्रमाणात शेती होते. या पारंपारिक पिकासोबतच येथील काही युवा शेतकऱ्यांनी आता नवीन हंगामी आणि भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेतीत देखील आपलं नशीब आजमवलं आहे.

हे पण वाचा :- भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती, असा करा अर्ज

विशेष म्हणजे या भाजीपाला आणि हंगामी पिकाच्या शेतीतून येथील शेतकऱ्यांना चांगले कमाई होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका 22 वर्षीय शेतकऱ्याने देखील असाच काहीसा बदल शेतीमध्ये केला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव येथील साहिल मोरे या 22 वर्षीय शेतकऱ्याने मिरची या भाजीपाला वर्गीय पिकाच्या लागवडीतून लाखों रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे.

या शेतकऱ्याला आपल्या आठ एकरातून तब्बल 50 लाख रुपयांच उत्पन्न मिळालं आहे. साहिल सांगतो की त्याची शेती ही नदीकाठावर असल्याने त्याच्या शेतीला कायमच पुराचा फटका बसत असतो. पुरामुळे सोयाबीन, कापूस या पिकातून अपेक्षित अशी कमाई त्याला होत नाही. यामुळे त्याने नोव्हेंबर नंतर मिरचीच्या पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला. मिरचीचे पीक लागवड केल्यानंतर पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा त्याने वापर केला.

हे पण वाचा :- कोरोनात नोकरीं गेली सुरु केली शेती ! 30 गुंठ्यात ‘या’ पिकाची लागवड केली अन झाली 10 लाखाची कमाई, वाचा ही यशोगाथा

तसेच पिकाला गरजेपुरतेच खते दिली. संतुलित प्रमाणात खतांची मात्रा दिल्याने पिकाची चांगली जोमदार वाढ झाली तसेच ड्रिपच्या माध्यमातून पाणी दिल्याने पाण्याचा अपव्यय टाळण्यास त्याला यश मिळाले. तसेच विद्राव्य खते देखील ड्रीपच्या माध्यमातून दिली आहेत. यामुळे त्याला मिरचीच्या पिकातून चांगले उत्पादन मिळाले आहे.

साहिल याने सांगितल्याप्रमाणे त्याला एकरी दीड लाखापर्यंतचा खर्च मिरची पिक उत्पादित करण्यासाठी आला आहे. यातून त्याला जवळपास 50 लाखांची कमाई झाली असून खर्च वजा जाता 35 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे साहिल सध्या शिक्षण देखील घेत आहे. तो बीएससी एग्रीकल्चरचे शिक्षण घेत असून शिक्षणासोबतच त्याने फुलवलेली ही शेती इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार वादळी पाऊस; हवामान विभागाची माहिती