काय सांगता ! ‘या’ कंपनीच्या स्टॉकने फक्त 3 वर्षात दिले 1000 टक्क्यांहुन अधिकचे रिटर्न, गुंतवणूकदार बनलेत मालामाल, पहा….

Ajay Patil
Published:

Share Market Stock Tips : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी विशेष खास आहे. वास्तविक, जे लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात ते एका गोष्टीवर नेहमीच सहमत असतात ती म्हणजे लॉन्ग टर्म मध्ये स्टॉकमधून चांगली कमाई होत असते. तुम्हीही एखाद्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून लॉन्ग टर्म मध्ये चांगला रिटर्न घेतला असेल. पण काही स्टॉक असेही असतात जे अल्पावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात.

आज आपण अशाच एका स्टॉक विषयी जाणून घेणार आहोत ज्या स्टॉकने मात्र तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1000% हून अधिकचे रिटर्न देण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे ही कंपनी 131 वर्ष जुनी आहे. निश्चितच आता तुम्हाला या कंपनी संदर्भात सर्व माहिती जाणून घ्यायची असेल. चला तर मग जाणून घेऊया हा मल्टीबॅगर स्टॉक नेमका आहे तरी कोणता?

हे पण वाचा :- पुण्याच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा; देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशनं पुण्यात, पहा कोणतं आहे ते स्टेशनं?

कोणता आहे तो स्टॉक

बाटलीबोई लिमिटेड या कंपनीचा तो स्टॉक आहे. या कंपनीचा स्टॉक मात्र तीन वर्षात सहा रुपयांवरून तब्बल 73 रुपयांवर पोहोचला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एप्रिल 2020 मध्ये हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर मात्र 6 रुपये 50 पैशावर ट्रेड करत होता. मात्र एप्रिल 2023 मध्ये हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 73 रुपये आणि 40 पैशांवर ट्रेड करत आहे. अर्थातच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1000% हून अधिकचा परतावा दिला आहे.

1 लाखाचे बनवलेत 11 लाख

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2020 च्या एप्रिल महिन्यात या स्टॉकमध्ये विश्वास दाखवला असेल आणि एक लाख रुपये गुंतवले असतील आणि गुंतवलेली रक्कम आत्तापर्यंत होल्ड करून ठेवली असेल, तर अशा गुंतवणूकदाराला आज तब्बल 11 लाख 43 हजार रुपयाचा परतावा मिळाला असेल.

हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ शेअर ठरला मल्टिबॅगर स्टॉक, एक लाखाचे बनलेत 12 कोटी; कोणता आहे तो स्टॉक, पहा….

कंपनी काय करते?

आपल्या गुंतवणूकदारांना मात्र तीन वर्षात लाखो रुपयांचा परतावा देणारी ही कंपनी तब्बल 131 वर्षे जुनी आहे. बाटलीबोई लिमिटेड, ही देशातील सर्वात जुन्या इंजिनिअरिंग कंपन्यांपैकी एक असल्याचा दावा केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीची सुरुवात 1892 मध्ये झाली असूनं तेव्हापासून आजतागायत इंजीनियरिंग वर्क्स मध्ये या कंपनीने अविरतपणे काम सुरू ठेवले आहे.

ही कंपनी मशीन टूल्स, टेक्सटाईल एअर इंजिनिअरिंग, टेक्सटाईल मशीनरी, एअर कंडिशनिंग, एनव्हायरमेन्टल इंजिनिअरिंग, विंड एनर्जी या बिझनेसशी संबंधित आहे. निश्चितच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मात्र तीन वर्षात चांगला परतावा दिला असून गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

मित्रांनो, शेअर मार्केट हे जोखीमपूर्ण क्षेत्र आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. येथे दिलेली माहिती हा कोणताही वित्तीय सल्ला नाही याची नोंद घ्यावी. आम्ही आपणास शेअर मार्केटच्या परफॉर्मन्स बाबत माहिती देतो नं की गुंतवणूक करण्याचा सल्ला. म्हणून कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe