अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजी नगर आणि ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! आयएमडीचा ऑरेंज अलर्ट

Ajay Patil
Published:

Maharashtra Rain Alert : एप्रिल महिना जवळपास संपत आला आहे. अवघ्या चार दिवसात एप्रिल महिना संपणार असून मे महिन्याला सुरुवात होणार आहे. मात्र तरीही अवकाळी पावसाने आणि गारपिटीने विश्रांती घेतली नसल्याचे चित्र आहे. अवकाळी काढता पाय घेत नसल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने अवकाळी पाऊस थैमान माजवत आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीट होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

आता खरीप हंगाम अवघ्या एक महिन्याच्या अंतरावर आहे. एका महिन्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर पूर्व मशागतीची तयारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र, अवकाळी पाऊस गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सातत्याने कोसळत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.

सध्या उन्हाळी हंगामातील कांदा काढणी जोरात सुरु आहे. शिवाय काही जिल्ह्यात हळद काढण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. आजही राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. 

या जिल्ह्यात गारपीट होणार

IMD ने वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पाऊस पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार

याशिवाय नाशिक, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही पावसाची शक्यता कायम राहणार असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

एकंदरीत, पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना अधिक सजग आणि सतर्क राहावे लागणार आहे. आज काही जिल्ह्यात गारपीटीची शक्यता लक्षात घेता त्या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यायची आहे तसेच आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधायचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe