मुंबई, दि. २९ : नाविद अंतुले यांच्या आकस्मिक निधनामुळे एक तरुण तडफदार नेतृत्व आपल्यातून गेले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाविद अंतुले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, नाविद यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळाली आणि धक्का बसला. वडील माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र अशी त्यांची ओळख असली
तरी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन एक तरुण, तडफदार युवा नेते अशी त्यांची ओळख रायगड जिल्ह्यातल्या जनतेला होऊ लागली होती. त्यांच्या अकाली निधनाने निश्चितपणे एक तरुण नेतृत्व आपल्यातून गेले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.