अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
#coronavirus तपासणीसाठी पाठविलेल्या १८ पैकी ११ व्यक्तींचे अहवाल प्राप्त. सर्व ११ अहवाल निगेटिव्ह.उर्वरित ०७ अहवालाची प्रतीक्षा. आतापर्यंत १५३३ व्यक्तींची स्त्राव नमुना चाचणी. त्यातील १४५३ अहवाल निगेटीव. एकूण ४३ बाधीत व्यक्तींपैकी २४ जणांना डिस्चार्ज.१७ जणांवर उपचार सुरू. pic.twitter.com/TQrIg3fNYf
— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) April 29, 2020
त्यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित ०७ अहवालाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात ‘करोना’बाधितांची संख्या वाढल्यामुळे काहीसे चिंतेचे वातावरण होते
जिल्ह्यामध्ये एकही ‘करोना’चा रुग्ण सापडला नसून नवे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
त्यामुळे ह्या आठवड्यात नगर शहरासह जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नाही.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १५३३ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यातील १४५३ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत.
एकूण ४३ बाधीत व्यक्तींपैकी २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून १७ जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
तसेच आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील दोन बाधीत व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®