भरधाव कारची धडक बसून दुचाकीस्वार ठार

Ahmednagarlive24
Published:

नगर | नगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारची समोरील दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक बसली. त्यात दुचाकीस्वार ठार झाला.

इकबाल रउफ शेख (बेपारी मोहल्ला, कादरी चौक) असे त्यांचे नाव आहे. मागे बसलेली १७ वर्षांची मुलगी जखमी झाली.

ही घटना चास शिवारातील डस्टर शोरूमसमोर ११ मे रोजी घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अजय वसंत दराडे यांच्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment