Havaman Vibhag Andaj : राज्यात गेल्या वीस दिवसांपासून सातत्याने भाग बदलत पाऊस पडत आहे. खरीप हंगाम अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला असताना पडणारा हा पाऊस मात्र शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे.
या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गेल्या महिन्यात देखील अशाच पद्धतीचे वातावरण होते. यामुळे खरीप हंगामातील गहू, हरभरा या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
सध्या पडत असलेला अवकाळी पाऊस हा हळद, कांदा या पिकासाठी घातक ठरत असून यामुळे डाळिंब, द्राक्ष यांसारखी फळ पिके देखील प्रभावित होत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसासाठी हवामान अंदाज जारी केला आहे.
हा हवामान अंदाज मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. कारण की राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे. महाराष्ट्रात जवळपास दोन मे 2023 पर्यंत पाऊस पडेल असं या अंदाज नमूद करण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- भारतीय रेल्वेत नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच करा अर्ज
आज 29 फेब्रुवारी रोजी अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडी कडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या ३० एप्रिल रोजी नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.
परिणामी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे यासंबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तसेच सामान्य जनतेने अधिक सजग आणि सतर्क राहायचे आहे.
याशिवाय उद्या मराठावाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मे महिन्यात देखील पावसाची शक्यता कायमच राहणार आहे.
हे पण वाचा :- अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला ! तब्बल ‘इतके’ आठवडे सलग पाऊस पडणार; भारतीय हवामान तज्ज्ञांचा अंदाज
1 मे रोजी विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांत पावसाची शक्यता राहणार असून या विभागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अर्थातच पावसाची तीव्रता मे मध्ये कमी होत आहे परंतु पाऊस पडेल असं सांगितलं जात आहे. कोकण वगळता जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.
2 मे रोजी देखील अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन मे 2023 ला राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे यासंबंधीत विभागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- मुंबई-अहमदाबाद प्रवास आता होणार सुसाट आणि सुरक्षित; Mumbai-Ahmedabad हायवेवर ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन भुयारी मार्ग, पहा…..