Best Summer Destinations : तुम्हीही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहलीचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील ५ पर्यटन स्थळे सर्वोत्तम ठरू शकतात. या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सुट्टीतील काही क्षण आनंदात घालवू शकता.
बजेट कमी असल्याने अनेकांना आवडत्या ठिकाणी फिरायला जाता येत नाही. त्यामुळे अनेकजण जवळच्या पर्यटन स्थळांना भेट देत असतात. पण आता तुम्ही देखील सुंदर आणि प्रसिद्ध हिल स्टेशनला कमी बजेटमध्ये भेट देऊ शकता.
अनेकांना उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या असतात. त्यामुळे सहलीचे नियोजन करत असतात. काही जण मित्रांसोबत तर काहीजण कुटुंबासोबत फिरायला जात असतात. या उन्हाळ्यात तुम्ही देखील भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशनला भेट देऊन सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
भारतातील या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस खास ठरू शकतात. तसेच या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी प्रति व्यक्ती फक्त १५ हजार रुपये खर्च येईल. मात्र तुमची सहल कायमस्वरूपी आठवणीत राहील.
पालमपूर
हिमाचल प्रदेशातील कांगडा खोऱ्यातील पालमपूर हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यात थंडगार हवेचा आनंद घेऊ शकता. हे पर्यटन स्थळ हिरवेगार, पर्वत आणि उत्तम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
पार्वती व्हॅली
पार्वती व्हॅली हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात आहे.या ठिकाणी तुम्ही काही निवांत क्षण घालवू शकता. या पर्यटन स्थळी तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता.
औली
औली हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले औली डेहराडूनपासून 270 किमी अंतरावर आहे. येथे बसने जाता येते. औली हे उत्तराखंडचे सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे.
वायनाड
वायनाड हा केरळमधील बारा जिल्ह्यांपैकी एक आहे. हे कोझिकोड जिल्ह्याच्या जवळ आहे. येथील पर्वत आणि हिरवळ पर्यटकांना खूप आवडते. येथील धबधबे, पर्वत आणि दरी यामुळे लोक साहसी पर्यटनासाठीही येथे येतात.
शिलाँग
जर तुम्हाला सुंदर आणि मनमोहक पर्यटन स्थळी भेट देईची असेल तर तुम्ही शिलाँग या ठिकाणी भेट देऊ शकता. भारतातील मिनी स्कॉटलंड म्हणून शिलाँगला ओळखले जाते.