Career Tips 2023 : आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकजण स्वतःचा व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात. मात्र सध्या नोकरी मिळणे खूप अवघड झाले आहे. मोठमोठ्या कंपन्या आपल्या कामगारांना घरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे खूप कमी लोकांना या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळत आहे.
नोकरी मिळत नसल्यामुळे तरुणाईंमध्ये बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक नोकरीची संधी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला अनुभवाशिवाय नोकरी मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवून बायोडाटा बनवावा लागणार आहे.
1. नेहमी सत्यापासून सुरुवात करावी
हे लक्षात ठेवा की कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना ती खोट्याने करू नये. कारण खोटं काही काळासाठी चांगले असते, परंतु जेव्हा ते उघड होतं तेव्हा त्यात तुम्ही अडकू शकता. त्यामुळे तुमच्या बायोडाटामध्ये शिक्षण, कौशल्य, अनुभव यांच्याशी निगडित चुकीच्या गोष्टी लिहिणे टाळावे.
2- जड शब्द वापरू नका
तुमच्या बायोडाटामध्ये जड शब्दांचा वापर करणे टाळा. कारण तुमची भाषा जितकी सोपी असेल तितकी ती समोरच्या व्यक्तीला समजेल. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीमध्ये बायोडाटा लिहिण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मी, माझे, तू, तुझे असे शब्द वापरू नका.
हे लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
- तुमच्या बायोडाटाच्या शीर्षस्थानी असणाऱ्या विभागात तुमचे नाव, पत्ता, ईमेल आणि फोन नंबर लिहावा.
- तसेच स्वतःबद्दल एक छोटा परिचय लिहावा. यात तुम्ही कोण आहात? या व्यवसायात येण्याची प्रेरणा काय आहे, तसेच तुमची व्यावसायिक उद्दिष्टे काय आहेत हे लिहावे.
- तसेच आपल्या वृत्तीबद्दल आणि तांत्रिक कौशल्यांबद्दल बोला. परंतु हे लक्षात ठेवा की लागू करण्यात आलेल्या पोस्टमध्ये आवश्यक म्हणून नमूद केलेल्या कौशल्यांचा उल्लेख तुमच्या बायोडाटामध्ये करायला हवा. तसेच ते हायलाइट करा.
- जर तुम्हाला कामाचा अनुभव नसेल तरीही तुम्ही तुमच्या अभ्यासाचे प्रकल्प, तुमच्या स्तरावर करण्यात आलेले काम इत्यादींबद्दल तुम्ही सांगू शकता.