बिग ब्रेकिंग : जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :-  बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे.

https://twitter.com/SrBachchan/status/1255709029336322048

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून लिहिले- ते गेले. .ऋषी कपूर गेले….मी तुटलो आहे ….कपूर फॅमिलीकडून ऋषी कपूर यांच्या मृत्यूच्या बातमीला रणधीर कपूर यांनी दुजोरा दिला आहे.

कालच अभिनेते इरफान खान यांच्या मृत्यूच्या शोक सागरातून बॉलिवूड कलाकार सावरलेही नाही तोच हि दुःखद घटना घडली आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील एच.एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

याबाबतची माहिती मोठा भाऊ रणधीर कपूर यांनी दिली होती. ६७ वर्षीय ऋषी कपूर यांना बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

ऋषी कपूर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर त्यांना फेब्रुवारीमध्ये दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment