सातारा जिल्ह्यातील बँकानी उद्दीष्टपुर्तीची परंपरा कायम ठेवावी – पालकमंत्री

Ahmednagarlive24
Published:

सातारा : जिल्ह्याचा २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा ८५०० कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखड्याचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी बँकांनी नवीन पत आरखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुरवातीपासूनच प्रयत्न करण्यात यावे असे सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा प्राधान्याने करावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,

जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, महाराष्ट्र बँकेचे आंचल प्रबंधक वसंत गागरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर उपस्थित होते.

नवीन पत आरखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व बँकानी सुरवातीपासूनच प्रयत्न करावेत असे सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा प्राधान्याने करावा.

आगामी काळात कृषी व औद्योगिक विकासात सातारा जिल्ह्याचे स्थान महत्त्वाचे राहणार असल्याचे बँकांनी शेती व लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करावा असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment