Best Summer Destinations : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण अनेकांना भारतातील सुंदर पर्यटन स्थळांविषयी माहिती नसते. त्यामुळे आज तुम्हाला भारतातील सुंदर आणि मनमोहक पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणार आहोत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला भारताबाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला भारतामध्येच सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळे पाहायला मिळतील. या ठिकाणांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. चंदीगडमध्ये अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
झाकीर हुसेन रोज गार्डन
गुलाबांनी भरलेली ही सुंदर बाग 30 एकरांवर पसरलेली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या नावावरून या उद्यानाला नाव देण्यात आले आहे. या बागेत अप्रतिम वास्तुकला आहे जी फुलांचे सौंदर्य प्रतिबिंबित करते.
या गार्डनमध्ये 1500 हून अधिक प्रकारच्या गुलाबांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला कधीही न पाहिलेली गुलाबांची फुले आणि झाडे पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट देऊ शकता.
इस्कॉन मंदिर
भारतामध्ये अनेक मंदिरे आहेत. तसेच प्रत्येक मंदिरांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. पण चंदीगडमधील इस्कॉन मंदिर हे सर्व मंदिरापेक्षा वेगेळे आहे. या ठिकाणी दररोज हजारो भाविक भेट देत असतात.
सुखना तलाव
चंदीगडमध्ये तुम्हीही फिरायला जाणार असाल तर नक्कीच सुखना तलावाला भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला स्टॉर्क आणि सायबेरियन बदके पाहायला मिळतील. तसेच फोटोग्राफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
रॉक गार्डन
चंदीगडमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी हे याक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. जर तुम्ही कलाप्रेमी असाल तर इथे तुम्हाला असे काही सापडेल जे तुम्हाला खूप आकर्षित करेल. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह चंदीगडला सुट्टी घालवण्यासाठी जात असाल तर तुमच्यासाठी रॉक गार्डन हे एक उत्तम ठिकाण आहे.