शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पहा….

Ajay Patil
Published:
Eknath Shinde Cabinet Meeting Decision

Eknath Shinde Cabinet Meeting Decision : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कायमच नवनवीन आणि कौतुकास्पद निर्णय घेतले जातात. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी शासनाकडून नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.

दरम्यान आज अर्थातच तीन मे 2023 रोजी शिंदे फडणवीस सरकारने एक अतीमहत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे.

आज संपन्न झालेल्या या बैठकीत अनेक मोठमोठे निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांसंबंधीत एक महत्त्वाच्या निर्णयाचा समावेश आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; देशाच्या आर्थिक राजधानीत तयार होणार पहिले अंडरवॉटर टनेल, 45 मिनिटाचा प्रवास आता मात्र 10 मिनिटात, वाचा….

आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे निश्चितच या संबंधित विषयात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून दरवर्षी या संबंधित विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रदेशात जाणाऱ्या 25 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती पुरवली जाणार आहे. निश्चितच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी खूपच फायदेशीर राहणार आहे.

दरम्यान आजच्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षपदी होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीस हजर होते. याव्यतिरिक्त राज्यातील इतरही मंत्री या बैठकीसं आज उपस्थित होते.

हे पण वाचा :- बातमी कामाची ! अवकाळी पावसामुळे मान्सूनकाळात पर्जन्यमान कमी राहणार का? पहा या प्रश्नाचे उत्तर सविस्तर

3 मे 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय खालील प्रमाणे

कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.

घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविला जाणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य दिले जाईल. सर्व शहरांमध्ये हा प्रकल्प राबवण्याचे नियोजन राज्य शासनाने आखले आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री महोदय यांनी यावेळी दिली आहे. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार आहेत.

शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय.

करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णय.

हे पण वाचा :- खुशखबर ! राज्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज, पहा कोणते युवक राहणार पात्र?

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe