Mumbai News : मुंबई ते कोल्हापूर रोज हजारो प्रवासी रेल्वे मार्गे प्रवास करतात. मुंबई राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. कॅपिटल शहर सोबतच मुंबई एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे.
तसेच कोल्हापूर हे देखील एक महत्त्वाचं अध्यात्मिक पर्यटन क्षेत्र आहे. अशा परिस्थितीत, या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रामुख्याने रेल्वे मार्गे कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूरचा प्रवास केला जातो.
मात्र कोरोना काळापासून कोल्हापूरवासियांसाठी अतिमहत्त्वाची असलेली सह्याद्री एक्सप्रेस बंद झाली आहे. मात्र आता या सह्याद्री एक्सप्रेस संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. खरं पाहता, मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी सह्याद्री एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
हे पण वाचा :- ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात निघाली भरती, 35 हजार रुपये पगार मिळणार, वाचा….
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी हे शुक्रवारी कोल्हापूर-मिरज-पुणे या मार्गावरील विद्युतीकरणाची आणि दुहेरीकरणाची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्या दरम्यान नरेश ललवाणी यांनी सकाळच्या कोल्हापूर कलबुर्गी आणि सह्याद्री एक्सप्रेस लवकरच सुरू करू असे आश्वासन रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत यांना दिले आहे. वास्तविक पाहता कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करा अशी मागणी जोर धरत आहे.
हे पण वाचा :- नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता सिडको Navi Mumbai मध्ये निओ मेट्रो सुरु करणार, कसा राहणार रूट, पहा…..
विशेष म्हणजे कोरोना काळापासून ही एक्सप्रेस बंद आहे त्यामुळे कोल्हापूरहून मुंबईकडे कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून ही एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी प्रवाशांची आहे.
मात्र, प्रवाशांच्या या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने अजूनही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. परंतु आता दस्तूरखुद्द मध्ये रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी ही ट्रेन लवकर सुरू करण्याच आश्वासन दिले असल्याने कोल्हापूरकरांना लवकरच सह्याद्री एक्सप्रेसचा लाभ मिळेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रात रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 3190 जागांसाठी निघाली भरती, 10वी आणि 12वी पास उमेदवार राहणार पात्र, वाचा….