सध्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुरु आहे. मंत्रिमंडळाने याबाबत राज्यपालांची भेट घेतली आहे. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेतली.
त्यांनी आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. हे पत्र त्यांची दिशाभूल करणारे आहे. यापाठीमागे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी या हालचाली आहेत, असा थेट आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटल यांनी केला.
दरम्यान, जयंत पाटील यांचा राष्ट्रपती राजवटीचा आरोप बिनबुडाचा पलटवार विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
राज्यात आणीबाणीसदृश्य परिस्थिती असल्याचं फडणवीस यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होते. फडणवीस यांनी राज्यपालांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केलीय. तर जयंत पाटलांचा राष्ट्रपती राजवटीचा आरोप बिनबुडाचा असल्याचा पलटवार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलाय.