7th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा लॉटरी लागण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते. गेल्या काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती.
त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ झाली होती. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते. त्यातील पहिली महागाई भत्ता वाढ मार्चमध्ये करण्यात आली आहे. त्याचा कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून होणार आहे.

आता वर्षातील दुसरी DA वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची DA वाढ वर्षातील पहिल्या महिन्यात केली जाते आणि त्यानंतर दुसरी DA वाढ 6 महिन्यांनी म्हणजेच जुलै महिन्यात केली जाते.
मात्र यावर्षीची 2023 ची DA वाढ मार्चमध्ये करण्यात आली आहे. तसेच जरी ही DA वाढ उशिरा करण्यात आली असली तरीही दुसरी DA वाढ नियमित वेळेत केली जाणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता AICPI निर्देशांकाच्या आधारे मोजला जातो. एआयसीपीआय निर्देशांकात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जानेवारीत हा निर्देशांक 132.8 अंकांवर होता. जे फेब्रुवारी महिन्यात 0.1 अंकांनी कमी होऊन 132.7 अंकांवर आले.
त्याच वेळी, मार्च महिन्यात हा आकडा 0.6 अंकांनी वाढून 133.3 अंकांवर पोहोचला. म्हणजेच, एक महिन्यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2023 पेक्षा 0.45 टक्के अधिक आणि एक वर्षापूर्वी म्हणजेच मार्च 2022 पेक्षा 0.80 टक्के अधिक. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा महागाई भत्ता आणि दिलासा वाढवण्याची अटकळ बांधली जात आहे.
कर्मचाऱ्यांचा सध्या DA 46 टक्के झाला आहे. मात्र DA वाढ करण्याअगोदर कर्मचाऱ्यांचा DA 42 टक्के होता. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच पुढील DA देखील 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जुलैमध्ये 4 टक्के महागाई भत्त्यात वाढ अपेक्षित आहे
वर्षातील दुसरी DA वाढ करण्याची मागणी आता कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना आशा आहे की जुलै महिन्यामध्ये दुसरी DA वाढ करण्यात यावी. तसेच पुढील लोकसभा निवडणूक पाहता सरकारकडून कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ करण्यात येऊ शकते.
एक कोटीहून अधिक लोकांना याचा फायदा होणार आहे
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA 50 टक्के होऊ शकतो. याचा फायदा पुन्हा एकदा सुमारे 47.58 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ नोंदवली जाऊ शकते. तसेच मूळ पगारात देखील वाढ होऊ शकते.