Summer Honeymoon Destinations In India : जोडीदारासोबत हनिमूनसाठी जायचंय? तर ही आहेत भारतातील सर्वात सुंदर ठिकाणे…

Ahmednagarlive24 office
Published:

Summer Honeymoon Destinations In India : देशात उन्हाळ्यामध्ये लग्नसराईचा हंगाम असतो. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकांची लग्न होत असतात. पण लग्न झाल्यानंतर अनेकांना फुरायला जायचे असते मात्र सुंदर ठिकांणांबाबत अनेकांना माहिती नसते.

जर तुमचेही लग्न या उन्हाळ्यामध्ये होत आहे आणि तुम्हालाही हनिमूनसाठी बाहेर फिरायला जायचे असेल तर तुम्ही देखील भारतातील काही सुंदर ठिकाणी हनिमूनसाठी जाऊ शकता.

भारतातील अशी काही थंड हवेची ठिकाणे आहेत जी तुमचे हनिमून प्लॅनिंग जबरदस्त बनवू शकते. उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्याने हनिमूनसाठी तुम्ही नेहमी थंड हवेची ठिकाणे निवडावीत. हनिमूनसाठी खालील ठिकाणे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत.

औली, उत्तराखंड

तुम्हालाही तुमचे हनिमून सुंदर आणि चांगल्या ठिकाणी साजरे करायचे असेल तर तुम्ही उत्तराखंडमधील औली या ठिकाणी जाऊ शकता. कडक उन्हाळ्यात देखील येथील हवामान थंड असते. जोडीदारासोबत इथे आल्यावर, तुम्ही स्कीइंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, सुंदर निसर्ग पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

लडाख

तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत बाईक रायडींग करायची आहे तर तुम्ही देखील लडाखला भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लॉन्ग बाईक रायडींग करू शकता. तसेच तुमच्या जोडीदारासोबत दऱ्या, तलाव, पर्वत आणि बौद्ध विहार यांचे सौंदर्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

गुलमर्ग, जम्मू आणि काश्मीर

हनिमून डेस्टिनेशनच्या यादीत काश्मीरचे नाव सर्वात आगोदर येत असते. त्यामुळे तुम्ही काश्मीरमधील गुलमर्ग येथे हनिमूनसाठी जाऊ शकता. गुलमर्ग हे अतिशय रोमँटिक ठिकाण आहे. सुंदर दऱ्या, हिरव्यागार बागा आणि तरंगत्या रिसॉर्ट्समध्ये जोडीदारासोबत राहण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.

कूर्ग

कर्नाटकातील कुर्ग हे देखील हनिमूनसाठी अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथे आल्यावर, तुम्ही निसर्गाचे सौंदर्य जवळून पाहू शकता आणि अनुभवू शकता आणि इथले हिरवेगार दृश्य आणि थंड वातावरण तुमच्या सहलीला अविस्मरणीय बनवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

सिक्कीम

तुम्ही हनिमूनसाठी तुमच्या जोडीदारासोबत सिक्कीमला देखील भेट देऊन आनंद वाढवू शकता. सुंदर तलाव आणि नैसर्गिक दृश्य तुम्ही याठिकाणी जोडीदारासोबत अनुभवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe