मोचा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

Ajay Patil
Published:

Mocha Cyclone Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी घातक ठरला आहे.

विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे काही भागात जीवितहानी देखील झाली आहे. अनेक भागात वीज पडल्यामुळे पशुहानी देखील झाली आहे.

काल अर्थातच रविवारी देखील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नासिक जिल्ह्यातील देवळा व आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडला आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांना पुन्हा एकदा फटका बसला आहे.

हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ 5 रुपयाचा स्टॉक पोहचला 590 रुपयावर, 78 हजाराचे बनलेत 1 कोटी; पहा डिटेल्स

अशातच आता बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होत आहे. या चक्रीवादळाला मोचा नावाने संबोधले जात असून या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता तयार होत आहे.

भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मोचा चक्रीवादळामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

वादळी पावसाची शक्यता राहणार आहे, यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. या वादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील जवळपास 11 राज्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! म्हाडाच्या कोकण मंडळाची पुन्हा नवीन सोडत निघणार; डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार येथे घर होणार उपलब्ध, केव्हा निघणार जाहिरात?

एकंदरीत या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात आणखी काही दिवस पावसाची शक्यता बनत आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. निश्चितच या तिन्ही विभागातील सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. वादळी पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘अस’ झालं तर तालुका कृषी अधिकारी राहणार जबाबदार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe