Electric Scooter : मेड इन इंडियाची आणखी एक शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च! सिंगल चार्जमध्ये धावणार 100 किमी

Ahmednagarlive24 office
Published:

Electric Scooter : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या अनेक इलेक्ट्रिक लॉन्च होत आहे. तसेच इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण आता मेड इन इंडियाची आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त आहे मात्र इंधनापासून सुटका मिळत असल्याने अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. पण आता ऑटो कंपन्यांकडून स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या जात आहेत.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये ‘मेड-इन-इंडिया’ स्मार्ट-ग्रेड इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 35000 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची संधी मिळत आहे. तसेच या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये आणि बॅटरी

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरचा बॅटरी पॅक देखील चांगला देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर १०० किमी धावू शकते.

स्वयंचलित स्वॅपिंग नेटवर्क खाजगी थर्मली नियंत्रित वातावरणात बॅटरी चार्ज करते. एका मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने जारी केलेल्या RFID कार्डद्वारे स्वाइपिंग नेटवर्कमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो आणि चार्ज केलेली बॅटरी 90 सेकंदांपेक्षा कमी वेळात तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी बदलू शकता.

त्याची प्रायव्हसी डिटेक्शन आणि प्रिव्हेंशन मॅनेजमेंट सिस्टम कोणत्याही अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध करण्यासाठी अँटी-वॅंडलिझम आणि एन्ट्री-थेफ्ट सारख्या वैशिष्ट्यांसह येते.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोबाइल अॅप्लिकेशन कंट्रोल, जीपीएस आणि इंटरनेट कंपॅटिबिलिटी, कीलेस इग्निशन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंग करण्याची संधी दिली जात आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी तुम्ही ९० सेकंदात बदलू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe