Weather Update : महाराष्ट्रात मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. राज्यातील काही भागात गारपीट झाली.
यामुळे निश्चितच उकाड्यापासून हैराण जनतेला दिलासा मिळाला असला तरी देखील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात तापमानातं वाढ पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील बहुतांशी भागात तापमानाने 40°c चा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्रात तर तापमानाने या हंगामातील विक्रम मोडला आहे.
हे पण वाचा :- CBSE 12वी चे निकाल लागले; महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी अन 12वीचे निकाल केव्हा? पहा डिटेल्स
राज्यात कमाल तापमान जवळपास 44 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक नमूद केले जात आहे. विशेष म्हणजे या तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यातील तापमान 45 अंश सेल्सिअस पुढे जाऊ शकते असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यासोबतच हवामान विभागाच्या माध्यमातून काही भागात पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठं पडणार वादळी पाऊस
IMD ने जारी केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज राजधानी दिल्लीत वादळी पावसाची शक्यता आहे. आज दिल्लीमध्ये जोरदार वादळ आणि रिमझिम पावसाची शक्यता राहणार आहे. याशिवाय राजस्थानमध्ये देखील आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागौर, जयपूर, चुरु, बिकानेर, जैसलमेर, दौसा, करौली या राजस्थानमधील जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील आज वादळी पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.
हे पण वाचा :- मुली वडिलांच्या मालमत्तेवर केव्हा दावा करू शकतात? कायदा सांगतो की….
उत्तराखंड मधील डोंगराळ भागात तसेच मैदानी भागात देखील पाऊस पडणार आहे. त्रिपुरा, मिझोरम, आसाम, नागालँड आणि मनिपुर या राज्यात देखील आज तुरळक भागात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
निश्चितच या संबंधित राज्यातील नागरिकांना यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे मात्र तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. दरम्यान बिहार, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज आहे यामुळे तेथील जनतेला बाहेर पडताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
हे पण वाचा :- यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे ना ! मग पेरणीपूर्वी ‘हे’ महत्वाचं काम कराच, वाचा….