अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- जगभरासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दररोज हजारो कोरोना बाधितांचे मृत्यू होत आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. प्रत्येक व्यक्ती आपआपल्यापरीने काम करत आहेत.
जामखेड शहरातील सोहेल इब्राहिम सय्यद या युवकाने व्हेंटिलेटर तयार केले असून त्या व्हेंटिलेटरला JIVA (जीवन आणि वायू प्रदान करणारा) असे नाव दिले आहे.
कोरोनावरील उपचारांसाठी व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवू शकतो, हे लक्षात घेऊन सोहेलने लॉकडाऊनच्या काळात घरात हे व्हेंटीलेटर तयार केले आहे. त्यासाठी ९० टक्के टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला.
अधिक व्हेंटीलेटरची गरज भासल्यास हा जीवा कमी खर्चात शासनाला उपलब्ध होऊ शकतो. सोहेल हा विद्युत अभियंता असून शिक्षण झाल्यानंतर पुणे येथील नामांकित एमएनसीमध्ये काम करून स्वतः उद्योजक होऊन लोकांना रोजगार निर्माण करून द्यावा,
या भावनेतून त्याने बांधकाम व्यवसाय सुरू केला. नवी दिल्ली येथील यंगेस्ट सीईओ या पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात आला आहे. त्याचे वडील इब्राहिम सय्यद हे व्यावसायिक आहेत.
भाऊ साहिल सय्यद हा फार्मसीचा विद्यार्थी आहे. व्हेंटिलेटरला जीवा हे नाव देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवणारे शूर सरदार जीवा महाले यांच्या नावाने प्रेरीत झाल्याचेही सोहेल याने सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®