अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातील आरआर बेकरीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या कत्तलखान्यावर आज सकाळी कोतवाली पोलिसांनी छापा टाकला.
56 हजार 500 रुपयांचे गोमांस जप्त करून चौघांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक विकास वाघ कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
काही इसम अहमदनगर शहरातील झेंडीगेट भागात आर आर बेकरीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना चालवतात. त्यावरून वाघ यांच्यासह पोसई मनोज कचरे, पोलीस स्टाफ व पंच यांच्यासह छापा टाकला
यावेळी जिशान आयाज कुरेशी (वय – २५ वर्षे), सोफियान आयाज कुरेशी (वय – २३ वर्षे), सालीम फयाज कुरेशी (वय २६ ), शान माजिव कुरेशी (वय – १८ वर्षे सर्व रा . सुभेदारगल्ली , झेंटीगेट , अहमदनगर) अशांना जागीच पकडले.
त्यांचेकडून ५६ , ००० / – रु किमतीचे ४०० किलो गोवंशीय जनावरांचे मांस व ५०० / – – किंमतीचे दोन चाकु एक सत्लुर असा एकुण ५६ , ५०० / – किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार, अपर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर विभाग संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांच्या पथकाने केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®