रेशन दुकानदाराने रेशन देण्यास नकार दिला किंवा कमी धान्य दिले तर ‘या’ नंबरवर करा तक्रार, कडक कारवाई होणार

Ajay Patil
Published:
Ration Card News

Ration Card News : आजची ही बातमी रेशन कार्डधारक व्यक्तींसाठी विशेष खास आहे. खरं पाहता शासनाच्या माध्यमातून देशातील गरीब आणि गरजू लोकांना स्वस्तात धान्य देण्यासाठी रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहे.

रेशन कार्डच्या मदतीने देशातील नागरिकांना कमी दरात धान्य वितरित केले जाते. तांदूळ, गहू तसेच साखर गोरगरीब जनतेसाठी कमी दरात शासनाकडून उपलब्ध करून दिले जाते.

मात्र अनेकदा रेशन दुकानदारांच्या माध्यमातून रेशन कार्ड धारक लोकांची फसवणूक केली जाते. काही ठिकाणी रेशन दुकानदार रेशन कार्ड धारक लोकांना धान्य देण्यास नकार देत असल्याचे उघडकीस आले असून काही ठिकाणी धान्य देताना वजनात तफावत आढळली आहे.

हे पण वाचा :- गुड न्युज आली रे ! ‘या’ लोकांच्या घरकुलासाठी सरकारने वितरित केला 60 कोटी रुपयांचा निधी, गरिबांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण, पहा…..

अशा परिस्थितीत रेशन दुकानदाराच्या या मनमानी कारभारावर आळा घालण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अशा रेशन दुकानदारांवर आता कडक कारवाई केली जात आहे. यासाठी केंद्र शासनाने लोकांना तक्रार करण्यासाठी काही तक्रार नंबर, हेल्पलाईन नंबर देखील जारी केले आहेत. प्रत्येक राज्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून रेशन हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

जर तुमचा रेशन दुकानदार तुम्हाला कमी धान्य देत असेल किंवा धान्य देताना वजनात झोल करत असेल तर तुम्हीही याची तक्रार आता घरबसल्या या हेल्पलाइन क्रमांकच्या माध्यमातून करू शकणार आहात. अशा परिस्थितीत आज आपण राज्यनिहाय रेशन हेल्पलाइन क्रमांक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनला कोकणातील ‘या’ महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावरही थांबा मिळणार? पहा….

  • महाराष्ट्र: १८००-२२-४९५०
  • आंध्र प्रदेश: १८००-४२५-२९७७
  • अरुणाचल प्रदेश: ०३६०२२४४२९०
  • आसाम: १८००-३४५-३६११
  • बिहार: १८००-३४५६-१९४
  • छत्तीसगड: १८००-२३३-३६६३
  • गोवा: 1800-233-0022
  • गुजरात: १८००-२३३-५५००
  • हरियाणा: 1800-180-2087
  • हिमाचल प्रदेश: 1800-180-8026
  • झारखंड: 1800-345-6598, 1800-212-5512
  • कर्नाटक: १८००-४२५-९३३९
  • केरळ: 1800-425-1550
  • मणिपूर: १८००-३४५-३८२१
  • मेघालय: 1800-345-3670
  • मिझोराम: 1860-222-222-789, 1800-345-3891
  • नागालँड: 1800-345-3704, 1800-345-3705
  • ओडिशा: 1800-345-6724 / 6760
  • पंजाब: 1800-3006-1313
  • राजस्थान: १८००-१८०-६१२७
  • सिक्कीम: १८००-३४५-३२३६
  • तामिळनाडू: 1800-425-5901
  • तेलंगणा: 1800-4250-0333
  • त्रिपुरा: १८००-३४५-३६६५
  • उत्तर प्रदेश: 1800-180-0150
  • उत्तराखंड: 1800-180-2000, 1800-180-4188
  • पश्चिम बंगाल: १८००-३४५-५५०५
  • दिल्ली: 1800-110-841
  • जम्मू: 1800-180-7106
  • काश्मीर: 1800-180-7011
  • अंदमान आणि निकोबार बेटे: 1800-343-3197
  • चंदीगड: 1800-180-2068
  • दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव: 1800-233-4004
  • लक्षद्वीप: १८००-४२५-३१८६
  • पुडुचेरी: 1800-425-1082

या हेल्पलाइन क्रमांकावर रेशन बाबत असलेल्या नागरिकांच्या तक्रारी दूर केल्या जाणार आहेत. तसेच रेशन दुकानदारांकडून जर नागरिकांची फसवणूक केली जात असेल तर या नंबर वर नागरिक तक्रार करू शकतात. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मग संबंधितांवर शासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे.  

हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ICMR मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा डिटेल्स

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe