Bank Holiday 2023: .. म्हणून तब्बल 12 दिवस बँका रहाणार बंद ; RBI ने दिली मोठी माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Bank Holiday 2023: काही दिवसात जून 2023 सुरु होणार आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो जून 2023 मध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहे. यामुळे जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ते तुम्ही तात्काळ करून घ्या.

आज अनेक कामे आॅनलाईन केली जात असली तरी, तरीही बँकेशी संबंधित अनेक कामांसाठी लोकांना बँकेत जावे लागते. चला मग जाणून घ्या जून 2023 मध्ये कोणत्या कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहे.

जून महिन्यात इतके दिवस बँका बंद राहतील

4,10 आणि 11 जून

4 जून हा रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

10 जून रोजी दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.

तर 11 जून रोजी रविवार असल्याने बँकेत कोणतेही काम नसून या दिवशी सुट्टी असेल.

15, 18 आणि 20 जून

मिझोराम आणि ओडिशामध्ये 15 जून रोजी राजा संक्रांतीनिमित्त बँका बंद राहतील

त्याचबरोबर 18 जून रोजी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

20 जून रोजी रथयात्रा निघणार असल्याने ओडिशा आणि मणिपूरच्या बँका बंद राहतील.

24, 25 आणि 26 जून

24 जून रोजी महिन्याचा शेवटचा आणि चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही.

25 जूनला रविवारी बँकांना सुट्टी असेल

26 जूनला फक्त त्रिपुरामध्ये खार्ची पूजेमुळे बँका बंद राहतील

28, 29 आणि 30 जून

महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि केरळमध्ये 28 जून रोजी ईद उल अजहानिमित्त बँका बंद राहणार आहेत

त्याचबरोबर 29 जून रोजी ईद उल अजहा मुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

30 जून रोजी मिझोराम आणि ओडिशाच्या बँकांमध्ये रीमा ईद उल अजहाला सुट्टी असेल.

हे पण वाचा :- Central Employee Salary Hike : कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर , 90 हजारांपर्यंत वाढणार पगार , जाणून घ्या कसं

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe