अशी असेल मतमोजणी प्रक्रिया

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरूवात होईल. उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष मतदान यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येतील.

अहमदनगर लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून क्रमाने मतमोजणीसाठी नेण्यात येतील.

मतमोजणीच्या ठिकाणी सीआरपीएफचे सुरक्षा कडे असणार आहे. बाहेरील बाजूस एसआरपी आणि पोलीस बंदोबस्त राहील.

37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 18 लाख 54 हजार 248 आहेत यापैकी 11 लाख 91 हजार 521 मतदारांनी मतदान केले आहे.

नगर मतदारसंघातील मतदानाची 64.26 टक्‍केवारी आहे तर 38- शिर्डी लोकसभा मतदारसंघाता एकूण मतदार 15 लाख 84 हजार 303 आहेत

यापैकी 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी 64.54 टक्‍केवारी आहे. 

दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी विधानसभा संघनिहाय प्रत्येकीसहा कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षात 14 याप्रमाणे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म ‍निरीक्षक असतील. 

आकडेवारी एकत्रित करण्यासाठी 12 कर्मचारी, रो ऑफिसर 6, सिलींग स्‍टाफ 36 व शिपाई 120 या प्रमाणे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक कक्षातील मतमोजणीवर सहाय्यक ‍निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष ठेवणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment