Astro Tips : आजच करा ‘हे’ उपाय, तुमच्याही कुंडलीतील दूर होईल शनीची साडेसाती; कसे ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Astro Tips :  हिंदू धर्मामध्ये ज्योतिष, पंचांग, राशी यांना खूप महत्त्व असून दररोज सकाळी उठून आपले भविष्य पाहणारे कोट्यवधी लोकही आपल्याला दिसतात. यात ज्योतिष आणि भविष्यावर अगाध श्रद्धा असणारी लोक योग, ग्रह, साडेसाती यांची माहिती सतत घेतात.

शनीची साडेसाती हा एक अडचणीचा आणि समस्याकारक काळ मानला जातो. अनेकांना शनीच्या साडेसातीला सामोरे जावे लागते. अशातच जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल तर काही उपाय आजच करा. याचे तुम्हाला लगेच परिणाम जाणवू शकतील.

1. दिव्यात लवंगा ठेवावी :

जर तुम्ही दिवा लावण्यापूर्वी त्यात काही लवंगा ठेवल्या तर तुमच्या नशिबात मोठा बदल होईल. मोहरीच्या तेलाच्या दिव्यामध्ये तुम्ही या लवंग ठेवल्या तर तुमचे भाग्य बदलेल.

2. पक्ष्यांना खायला द्यावे :

जर तुम्ही पक्ष्यांना खायला दिले तर तुमच्या जीवनातील काही बाबींवर चांगला परिणाम दिसून येईल. तुम्हाला करिअर आणि वैयक्तिक आघाडीवर यश मिळेल.

3. दान करावे:

दान हे एक अतिशय चांगले काम असून जे तुमची सत्कर्मे वाढवते तसेच ज्यावेळी तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल त्यावेळी तुम्हाला ते मदत करत असते. इतरांना मदत करणे हा मानवधर्म आहे असून त्यातून पुण्य मिळत असते.

4. कापूर आरती करावी :

दैवी-देवाच्या पारंपारिक पूजेमध्ये कापूरचे महत्त्वाचे स्थान आहे. कापूरची आरती बऱ्याच वेळा लोकप्रिय मंदिरांमध्ये सकाळी वेगळी आरती म्हणून करण्यात येते. हे चिंता आणि तणाव दूर करते. शिवाय पितृदोष आणि कालसर्प दोषासाठी एक प्रभावी उपाय म्हणून ते काम करते.

5. गायीला भाकरी अर्पण करा:

इतकेच नाही तर गायीला भाकरी अर्पण करावी. पीठ मळून घेण्यापूर्वी या भाकरी दुधाने ओल्या करून त्या गाईला खाऊ घाला. शास्त्रात पहिली भाकरी गाईला आणि शेवटची भाकरी कुत्र्याला, असा समज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe