महत्वाची बातमी : राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये ! वाचा अहमदनगर कोणत्या झोनमध्ये ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- केंद्रीय आरोग्य सुरक्षा सचिव प्रीती सुदान यांनी शुक्रवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. त्यामध्ये या राज्यांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत वर्गीकरण करण्यात आले आहे. 

यामध्ये राज्यातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये आहेत. तर ऑरेंज झोनमध्ये एकूण १६ जिल्ह्ये आहेत. सहा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये करण्यात आला आहे.

तसेच देशातील रेड झोन अंतर्गत 130 जिल्हे, ऑरेंज झोन अंतर्गत 284 आणि ग्रीन झोन अंतर्गत 319 जिल्हे समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच दर आठवड्याला त्याचे मूल्यमापन केले जाणार आहे.

महत्वाचे म्हणजे रुग्णांच्या संख्येत कमी जास्त वाढ झाली तर संक्रमित प्रकरणांनुसार हा झोन बदलेल.राज्य सरकारांना स्थानिक आकडेवारी आणि परिस्थितीनुसार ऑरेंज किंवा रेड झोनमधील जिल्ह्यांच्या संख्येत वाढ करण्याची मुभा आहे, असं देखील या पत्रात म्हटलंय. 

पहा राज्यातील कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये?

रेड झोन : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर

ऑरेंज झोन : रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन : उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

कुठल्या झोनमध्ये काय नियमावली असेल याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.ऑरेंज झोनमध्ये ठराविक अस्थापना सुरु राहणार असून याबाबतचा निर्णय एवढ्या दोन दिवसांत केंद्र घेण्याची शक्यता आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment