Post Office Scheme : पोस्टा ऑफिसच्या अनेक योजनांवर आजही गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. कारण सध्याच्या काळात बचतीसाठी आणि जोरदार परताव्यासाठी सर्वात जास्त गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसकडेच येतात. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये तर गुंतवणुकीची मर्यादा नाही.
इतकेच नाही तर या योजनांचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला काही योजनांमध्ये अनेक खाती उघडता येतात. तसेच तुम्हाला कर सवलतही मिळतो. तसेच योजनेवर इतर फायदे मिळतात. दरम्यान अशाच काही योजना आहेत ज्यात तुम्हाला कर सवलत मिळेल आणि शानदार परतावा मिळेल.
5 सर्वोत्तम पोस्ट ऑफिस बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजना | 8.2% | ||
सुकन्या समृद्धि योजना | 8.0% | ||
| 7.7% | ||
5 वर्षाचे वेळ ठेव खाते | 7.5% | ||
| 7.5% |
जाणून घ्या व्याजदर
महिला सन्मान बचत पत्र | 7.5% |
मासिक उत्पन्न योजना | 7.4% |
पीपीएफ खाते योजना | 7.1% |
आवर्ती ठेव योजना | 6.2% |
बचत खाते | 4.0% |
पोस्टाची वृद्धांसाठी सर्वोत्तम बचत योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना होय. या योजनेवर सरकारकडून सर्वात जास्त व्याज आणि कर सवलत देते. 2023 च्या अर्थसंकल्पात सरकारकडून आपली ठेव मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी म्हणजे 1 जानेवारी 2023 पासून सरकारकडून व्याजदर 8.0% पर्यंत वाढवण्यात आला होता. यानंतर, पुढील तिमाहीसाठी (एप्रिल ते जून 2023) व्याजदर आणखी वाढवून तो 8.2% इतका केला आहे.
अशातच त्यात जमा करण्यात आलेल्या या पैशाच्या बदल्यात तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक तिमाहीत निश्चित उत्पन्न मिळेल. जर 5 वर्षे पूर्ण झाली तर, तुमची ठेव रक्कम आता पूर्ण परत करण्यात येते. जमा करण्यात आलेल्या पैशावर तुम्हाला कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते.
तसेच पोस्टाची मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी सर्वोत्कृष्ट बचत योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. यात सरकार सध्या 8.0 % व्याज देत आहे. तुम्हाला त्याच्या ठेवी आणि व्याजावरही कर सवलत दिली जात आहे. अवघ्या 250 रुपयांमध्ये यात तुम्हाला खाते उघडता येते आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला यात 1.50 लाख रुपये जमा करता येतात.
लहान रक्कम जमा करून, तुम्ही तुमच्या मुलीसाठी 2.69 लाख ते 67.43 लाख रुपयांचा जबरदस्त परतावा मिळवू शकता. त्यामुळे तुम्हाला मुलीचे लग्न, शिक्षण किंवा आजारपणावर खाते बंद करूनही पैसे मध्यंतरी काढता येतात.
अशातच आता पैसे दुप्पट करण्याच्या योजनेचे नाव किसान विकास पत्र असे आहे. यात तुम्ही जमा केलेली रक्कम 10 वर्षांनंतर दुप्पट केली जाते. 1 एप्रिल 2023 पासून, केंद्र सरकारकडून त्याचा व्याजदर 7.5% पर्यंत वाढवण्यात आला आहे. गरज असेल तर 2.50 वर्षांनंतर, त्याचे पैसे मधल्या काळात कधीही काढता येतात.
या योजनेचे नाव किसान विकास पत्र असले तरी कोणतीही व्यक्ती यात खाते उघडू शकते. या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्ध, पुरुष, महिला, कर्मचारी, मजूर यांपैकी कोणालाही खाते उघडून 10 वर्षांत त्यांचे पैसे दुप्पट करता येतात.
पुढची योजना म्हणजे PPF खाते योजना. तुम्ही या योजनेत प्रत्येक वर्षी कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करता येतात. यात तुम्ही 1.63 लाख ते 40 लाख रुपये 15 वर्षात लहान रक्कम जमा करू शकता. ही योजना मुलांचे लग्न, शिक्षण किंवा घर यासारखी मोठ्या रकमेची कामे पूर्ण करण्यासाठी खूप फायद्याची आहे. सध्या त्यावर 7.1% व्याज दिले जात आहे. त्याची ठेव, व्याज आणि मॅच्युरिटी, तिन्ही करमुक्त असतात.
आता तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना या योजनेत, पुढील 5 वर्षांसाठी, तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या बदल्यात तुम्हाला प्रत्येक महिन्यात एक निश्चित रक्कम दिली जाते. ही रक्कम त्या ठेवीवरील व्याजाच्या स्वरूपात असून 5 वर्षानंतर, तुमची ठेव रक्कम परत करण्यात येते. दरम्यान नुकत्याच सादर केलेल्या 2023 च्या अर्थसंकल्पात सरकारने त्यात पैसे जमा करण्याची मर्यादाही 4.50 लाखांवरून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. सरकारने संयुक्त खात्याची मर्यादाही 9 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये केली आहे. 1 एप्रिल 2023 पासून त्याचा व्याजदर 7.4% पर्यंत वाढवला गेला आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
तुम्ही या योजनेत कमीत कमी 1000 रुपये जमा करून ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते उघडता येत असून 2023 च्या अर्थसंकल्पात सरकारकडून या योजनेत पैसे जमा करण्याची मर्यादा 30 लाख रुपये करण्यात आली आहे. ही मर्यादा १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. सध्या या खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येत आहेत. हा पैसा 5 वर्षांसाठी ठेवला जात असून तुम्हाला प्रत्येक तिमाहीत व्याजाच्या स्वरूपात निश्चित उत्पन्न दिली जाते.
किती व्याज दिले जाते?
- सध्या त्यावर तुम्हाला 8.2 % व्याज दिले जाईल. जे इतर कोणत्याही सरकारी बचत योजनेपेक्षा खूप जास्त आहे.
उत्पन्न - जर तुम्ही त्यात 1 लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला प्रत्येक तिमाहीत 2050 रुपये दिले जातील. परंतु जर तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त रक्कम जमा केलीत तर त्यानुसार तुम्हाला उत्पन्न कमी-जास्त दिले जाईल.
पात्रता
- जर तुम्हाला यात खाते चालू करायचे असेल तर तुमचे वय 60 वर्षांवरील असावे. परंतु हे खाते फक्त भारतीयांना चालू करता येत परदेशी नागरिक किंवा अनिवासी भारतीयांना याची परवानगी नाही.
- तसेच सेवानिवृत्ती घेणारे सामान्य कर्मचाऱ्यांना वयाच्या 55 वर्षानंतरही हे खाते उघडता येते.
- लष्कर आणि संरक्षण विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांना वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही हे खाते उघडता येते
- परंतु हे लक्षात ठेवा की कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचा लाभ मिळाला तर 1 महिन्याच्या आत खाते उघडले तरच त्यांना ही सवलत मिळते.
संयुक्त खाते उघडता येते का?
- दरम्यान हे समजून घ्या की संयुक्त खाते फक्त पती किंवा पत्नीसह चालू करता येते. तुम्हाला तुमच्या नावावर एकापेक्षा जास्त खाते चालू करता येते. मात्र कमीत कमी आणि जास्तीत जास्त ठेवीचे निर्बंध सर्व खात्यांसाठी लागू असणार आहेत.
कर सवलत - 1.50 लाखांपर्यंतच्या ठेवींवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत दिली जात आहे.
जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये
किती रक्कम जमा करावी लागते:
हे खाते अवघ्या 250 रुपयांमध्ये चालू केले जाते. त्यानंतर, प्रत्येक वर्षी कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करता येतात. तसेच तुमच्या सोयीनुसार वर्षातून कितीही वेळा पैसे जमा करू शकता.
व्याज
सध्या, या योजनेत जमा करण्यात आलेल्या पैशावर वार्षिक ८.०% दराने व्याज दिले जात आहे. सरकारकडून दर तिमाहीपूर्वी नवीन व्याजदर जाहीर करण्यात येते. सध्या 1 एप्रिल 2020 पासून त्याच्या व्याजदरात कोणताही बदल केला नाही.
परतावा
- या योजनेचे खाते 21 वर्षे चालते, मात्र पैसे जमा करण्यासाठीची सवलत सुरुवातीपासून फक्त 15 वर्षांसाठीच असते. 15 ते 21 वर्षांपर्यंत, तुमच्या अगोदरच्या ठेवींवर व्याजदर चक्रवाढ होत राहतो. तसेच 21 वर्षांनंतर, तुमच्या मुलीला संपूर्ण ठेव आणि व्याज जोडून एकूण रक्कम दिली जाते. तसेच मुलीच्या लग्नाच्या वेळीही खाते बंद करून संपूर्ण पैसे काढता येत आहेत.
पात्रता :
- कोणत्याही पालकांना त्यांच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडता येते. तसेच कायदेशीर पालकही आपल्या मुलीसाठी हे खाते उघडतात.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे खाते एका पालकाच्या दोन मुलींसाठी उघडता येते.
असे करा बंद - काही विशेष परिस्थितींमध्ये, खाते मध्यभागी बंद करण्याची सुविधा असते
- खातेदार मुलीचा मृत्यू झाला तर
- खातेदार मुलीच्या गंभीर आजाराच्या बाबतीत
- मुलीच्या खातेदाराच्या पालकाचा मृत्यू झाला तर
कर सवलत
केंद्र सरकार सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेल्या या पैशावर कलम 80C अंतर्गत कर सवलत देत आहे. नियमानुसार, कलम 80C अंतर्गत सर्व गुंतवणूक आणि खर्चांवर प्रत्येक वर्षी 1.50 लाखांपर्यंतच्या रकमेवर कर सवलत दिली जाते. या योजनेचा व्याज आणि मुदतपूर्तीवर संपूर्ण कर सवलत आहे.
जाणून घ्या किसान विकास पत्र योजनेची वैशिष्ट्ये
किती रक्कम जमा करावी लागते: कमीत कमी 1000 रुपये जमा करून तुम्ही किसान विकास पत्र खाते चालू करू शकता. कमीत कमी ठेवीवर कोणतीही मर्यादा नसते, तुम्हाला रु. 100 च्या पटीत कोणतीही रक्कम जमा करता येते आणि परिपक्वतेवर दुप्पट रक्कम मिळवता येते. तुम्हाला एका व्यक्तीच्या नावाने अनेक खाते उघडता येतात.
व्याज :
– या खात्यावर वार्षिक ७.५% व्याज दिले जात आहे आणि तुम्हाला ९ वर्षे आणि ११ महिन्यांनंतर ठेव दुप्पट दिली जाते.
परतावा :
– तुम्ही रु. 1,000 जमा केले तर, तुम्हाला 2,000 रुपये परत मिळतात. तसेच तुम्ही 1 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला 2 लाख रुपये परत मिळतात. 2 लाख डिपॉझिटसाठी तुम्हाला 4 लाख रुपये आणि 5 लाख डिपॉझिटसाठी 10 लाख रुपये दिले जातात. तसेच तुम्ही जितके जास्त पैसे जमा कराल तितके पैसे तुम्हाला दुप्पट परत केले जातात.
अशी करा योजना बंद :
– तुम्हला कोणत्याही विशेष गरजेवर 2.5 वर्षानंतरही खाते बंद करून पैसे काढता येतात. तुम्ही खातेधारकाच्या मृत्यूनंतरही खाते मध्यभागी बंद करू शकता
पात्रता :
कोणत्याही प्रौढ व्यक्तीला त्याच्या नावाने किसान विकास पत्र खाते उघडता येते. तुम्ही यात संयुक्त खाते 2 किंवा 3 जण एकत्र उघडू शकता. तसेच मुलाच्या नावाने त्याच्या पालकाच्या वतीने किसान विकास पत्र खाते चालू करता येते. 10 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलाला हे खाते स्वतःच्या नावाने चालू करता येते.
जाणून घ्या पीपीएफ खाते योजनेची वैशिष्ट्ये
गुंतवणूक :
तुम्ही हे PPF खाते फक्त 500 रुपये जमा करून चालू करू शकता. त्यानंतर प्रत्येक वर्षी कमीत कमी 500 रुपये जमा करणे अनिवार्य आहे. दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही वर्षातून कितीही वेळा आणि कितीही वेळा पैसे जमा करू शकता. खाते 15 वर्षे टिकते. तुमच्या गरजेनुसार ते मध्येच थांबवता येते.
व्याज :
सध्या या खात्यावर ७.१ टक्के व्याज दिले जात आहे. सरकार दर तिमाहीपूर्वी त्यांचे नवीन व्याजदर जाहीर करत असते, परंतु 1 एप्रिल 2020 पासून त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही.
तर खाते बंद करता येते
- खातेदाराच्या गंभीर आजाराच्या बाबतीत
- जोडीदार किंवा मुलांचा गंभीर आजार
- स्वतःच्या किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी
- खातेदाराने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले तर
जाणून घ्या पात्रता :
- 18 वर्षांवरील कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याच्या नावाने पीपीएफ खाते चालू करता येते.
- हे खाते मुलाच्या नावाने त्याच्या/तिच्या पालकांच्या किंवा कायदेशीर पालकाच्या वतीने उघडता येते. मूल 18 वर्षांचे होईपर्यंत, त्याचे
- पीपीएफ खाते चालविण्याची जबाबदारी पालकाची असते.
- तसेच हे खाते संयुक्त खाते उघडता येत नाही आणि एका व्यक्तीच्या नावाने दुसरे खाते उघडता येत नाही.
कर सवलत :
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर करमुक्त असल्याने त्याच्या मदतीने, वार्षिक 1.50 रुपयांच्या ठेवींवर कर सवलत दिली जाते. यावर व्याज आणि मुदतपूर्तीवर पूर्ण कर सवलत दिली जाते.
जाणून घ्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची वैशिष्ट्ये
गुंतवणूक :
हे खाते कमीत कमी 1000 रुपये जमा करून चालू करता येते. 2023 च्या अर्थसंकल्पात, सरकारकडून एकल खात्याची ठेव मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी 9 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे. मात्र ही मर्यादा १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. सध्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येत आहेत. जर तुम्ही संयुक्त खाते चालू केले तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात.
कालावधी:
या योजनेत 5 वर्षांसाठी पैसे जमा करण्यात येतात. तसेच तुमच्या ठेवीच्या बदल्यात तुम्हाला प्रत्येक महिन्याला निश्चित उत्पन्न दिले जाते.
जाणून घ्या व्याज दर आणि कर सवलत: वार्षिक ७.१% दराने व्याज उपलब्ध असून त्यात करात सवलत नाही.
पात्रता:
18 वर्षांपेक्षा जास्त वय असणारी कोणतीही व्यक्ती त्याच्या नावावर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते उघडू शकत आणि एका व्यक्तीच्या नावाने अनेक खाती उघडली जाऊ शकतात, मात्र कमाल ठेव 4.5 लाखांपेक्षा जास्त असत नाही.
मुलाचे खाते:
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते त्याच्या पालकाच्या वतीने मुलाच्या नावावर चालू करता येते. तसेच 10 वर्षांखालील मूल हे खाते स्वतःच्या नावाने उघडू शकते.
संयुक्त खाते:
2 किंवा 3 लोक एकत्रितपणे संयुक्त मासिक उत्पन्न योजना खाते उघडू शकतात.