महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

Published on -

नागपूर, दि. 1 : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिले होते.  

त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महा निरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला व निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यावेळी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!