Indian Navy Recruitment : देशसेवेची इच्छा असलेल्या तरुणांसाठी विशेषता भारतीय नौदलात जाऊन देशसेवा करण्याची ज्या तरुणांना इच्छा असेल अशा तरुणांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे.
यासाठीची अधिसूचना नौदलाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे ज्या तरुणांना भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही निश्चितच एक सुवर्णसंधी राहणार आहे. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण भारतीय नौदलात अग्नीवीर पदाच्या किती रिक्त जागा भरल्या जाणार आहेत? यासाठी काय पात्रता राहणार आहे? अर्ज कसा करावा लागेल? तसेच अर्ज करण्याची अंतिम दिनांक कोणती राहील? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती आणि कोणत्या पदांसाठी होणार भरती?
भारतीय नौदलाने काढलेल्या अधिसूचनेनुसार नौदलात अग्निवीर या पदाच्या रिक्त असलेल्या 1638 जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठी मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स या दोन विषयासह बारावी सायन्स उत्तीर्ण असलेला उमेदवार पात्र राहणार आहे. सोबतच सदर उमेदवार रसायनशास्त्र / जीवशास्त्र/ संगणक विज्ञान यापैकी किमान एक विषयासह बारावी सायन्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार नाही सातवा वेतन आयोगाची थकबाकी? वाचा…
वयोमर्यादा
या पदासाठी एक नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2002 या कालावधीत जन्मलेले उमेदवार पात्र राहणार आहेत.
उमेदवाराची निवड कशी होणार
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदलात अग्नीवीर या पदासाठी लेखी परीक्षा, पीएफटी आणि वैद्यकीय तपासणी तसेच कॉम्युटर बेस्ड टेस्टच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करायचा आहे. अद्याप यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली नाही. उद्या अर्थातच 29 मे 2023 पासून अर्ज करता येणार आहे. agiveernavy.cdac.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवाराला अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या पदासाठी 16 जून 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.