Jyotish Tips : सावधान! कुंडलीत चंद्र ग्रह अशुभ असेल तर होणार ‘हे’ गंभीर आजार, कायमचा आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Published on -

Jyotish Tips :  सर्वात अगोदर हे लक्षात की ज्योतिषशास्त्रात रवी, चंद्रासह नवग्रहांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. चंद्र मानवी मनावर परिणाम करत असल्याचे ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र प्रबळ किंवा चांगल्या स्थितीत असेल अशा व्यक्तीची मानसिक ताकद उत्तम असते.

कारण अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थिती आणि समस्येवर सहज मात करू शकते. कुंडलीत चंद्र ग्रह अशुभ असेल तर गंभीर आजार होतात. परंतु त्यावर तुम्ही त्वरित उपाय मिळवू शकता. दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर.

मानसिक समस्या निर्माण होतात

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र अशुभ असल्यास व्यक्ती त्यावेळी मानसिकदृष्ट्या दुर्बल होतो. तसेच या सोबतच त्या व्यक्तीच्या आईला काही समस्या निर्माण होतात. या काळात अनेक वेळा ती व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते.

या आजारांना सामोरे जावे लागते

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत चंद्र नकारात्मक आणि अशुभ असल्यास तर त्या व्यक्तीला मेंदूचे दुखणे, डोकेदुखी, तणाव, नैराश्य, भीती, अस्वस्थता, दमा, रक्त संबंधित विकार, अपस्माराचे झटके, वेडेपणा किंवा मूर्च्छा इ. चा त्रास होतो.

निद्रानाशाची समस्या येते

जन्मपत्रिकेत चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे खोकला, सर्दी, दमा यांसारख्या आजारांमुळे श्वास किंवा फुफ्फुसात अडथळे निर्माण होतात. तसेच एकाग्रतेचा अभाव, निद्रानाश आणि मन विचलित करणाऱ्या सर्व समस्यांचे कारणही चंद्राची अशुभ स्थिती असते.

आजचा करा हे उपाय

या मंत्रांचा जप करा:

चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी चंद्र मंत्रांचा जप करावा.

ऊं सों सोमाय नम:।

ऊं श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:

ऊं श्रीं श्रीं चन्द्रमसे नम:

पूजा करा

चंद्र बलवान होण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात थोडे गंगाजल, दूध, तांदूळ तसेच साखर मिसळून चंद्राला अर्पण करा. जर तुम्ही असे केले तर भगवान शिव आणि चंद्राची कृपा प्राप्त होते. तसेच प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून चंद्राची पूजा करावी. त्यामुळे चंद्राचा नकारात्मक प्रभाव दूर होतो.

प्रत्येक सोमवारी शंकराची पूजा करा

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र कमकुवत किंवा अशुभ असेल तर त्याने दर सोमवारी शिवलिंगाचा रुद्राभिषेक करा. जर तुम्ही असे केले तर चंद्राच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!