Pune Railway News : मध्य रेल्वेने पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे जोडण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे आणि सांगली ही पश्चिम महाराष्ट्रातील दोन अति महत्त्वाची शहरे. पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं तर सांगली ही एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ आहे.
यामुळे सांगलीहून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या कायमच उल्लेखनीय राहिली आहे. दरम्यान हेच प्रवासी संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेने या मार्गावर नवीन सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे कडून पुणे-मिरज-पुणे ही सुपरफास्ट ट्रेन आता सुरू केली जाणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार 6 जून 2023 पासून पुणे मिरज पुणे सुपरफास्ट ट्रेन सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत तसेच थांब्यासंदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केव्हा सुरु होणार ट्रेन?
खरंतर गेल्या काही महिन्यापासून या मार्गांवार ट्रेन सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. दरम्यान रेल्वे प्रवाशांच्या या मागणीवर रेल्वेने सकारात्मक निर्णय घेतला आहे. यानुसार या पुणे-मिरज मार्गांवर साप्ताहिक गाडी चालवली जाणार आहे. येत्या पाच दिवसात अर्थातच 6 जूनला ही सुपरफास्ट ट्रेन सुरू होणार आहे.
हे पण वाचा :- दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! राज्याच्या ‘या’ विभागात निघाली 512 रिक्त पदांसाठी मोठी भरती, आजच करा अर्ज
कसं राहणार वेळापत्रक?
पुणे मिरज पुणे साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन दर मंगळवारी चालवली जाणार आहे. ही ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून दर मंगळवारी सकाळी आठ वाजता मिरज कडे रवाना होणार असून ती मिरज रेल्वे स्थानकावर दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही ट्रेन त्याच दिवशी अर्थातच मंगळवारी मिरज रेल्वे स्थानकावरून दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी पुण्याकडे रवाना होणार असून ती पुणे रेल्वे स्थानकावर सायंकाळी सात वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे.
कुठं थांबणार?
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी या मार्गावरील जेजुरी, लोणंद, सातारा, कऱ्हाड, सांगली या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.