Anganwadi Sevika : महाराष्ट्र राज्य शासनाचे महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून एक मोठी माहिती समोर आली आहे.
खरंतर राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! राज्याच्या ‘या’ विभागात निघाली 512 रिक्त पदांसाठी मोठी भरती, आजच करा अर्ज
वेतनात वाढ करण्याचा निर्णय झाला असला तरी निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून होणार हा मोठा प्रश्न? अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. मात्र आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.
राज्य शासनाने या संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. मंत्रिमंडल परभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना वाढीव मानधनाचा लाभ जुलै महिन्यापासून मिळणार आहे.
वास्तविक, मानधन वाढीचा हा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला. एक एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवण्यात आले.
यानुसार अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना सात हजार २०० तर अंगणवाडी मदतनीसांना पाच हजार ५०० रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला. परंतु अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना वाढीव मानधन मिळत नव्हते. म्हणून अंगणवाडी सेविकांमध्ये कमालीची नाराजगी पाहायला मिळाली होती.
तसेच वाढीव मानधनाचा लाभ लवकरात लवकर दिला जावा अशी मागणी केली जात होती. आता राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांची ही मागणी मान्य करत जुलै महिन्यापासून वाढीव मानधनाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अंगणवाडी सेविकांना तसेच मदतनिसांना जे मानधन दिल जात त्यामध्ये केंद्र शासनाचा वाटा हा 60% असतो आणि राज्य शासनाचा वाटा हा 40% असतो.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसनंतर महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या मार्गांवरही सुरु होणार Vande Bharat Train, वाचा….