Maharashtra SSC Result Date 2023 :- इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचंच लक्ष लागलेल्या इयत्ता दहावीचा निकाल उद्या लागणार आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल.राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली होती.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल उद्या (दि. 2) रोजी ऑनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात येत आहे. यााबबत मंडळाने पत्रकाव्दारे कळविले आहे.
![Maharashtra SSC Result Date 2023](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/06/ahmednagarlive24-ahmednagarlive24-Copy-of-Copy-of-Ahmednagar-2023-05-22T155753.286.jpg)
दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर
इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचंच लक्ष लागलेल्या इयत्ता दहावीचा निकाल उद्या लागणार आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.
बारावीच्या मागोमाग दहावीचेही निकाल
दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. पण, यंदाच्या वर्षी मात्र बारावीच्या मागोमाग दहावीचेही निकाल लागलीच जाहीर केले जाणार आहेत. 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेचे निकाल लागल्यानंतर आता लाखो विद्यार्थी त्यांच्या शालेय आयुष्याच्या विश्वाहून बाहेर पडून महाविद्यालयीन जीवनाची नवी सुरुवात करणार आहेत.
दहावीचा निकाल कसा पाहायचा?
अद्याप दहावी आणि बारावीचे रिझल्ट डिक्लेअर झालेले नाहीत. पण ज्यावेळी हे रिझल्ट डिक्लेअर होतील तेव्हा mahresults.nic.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
निकाल बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर नीट बघून एंटर करणं आवश्यक आहे. आईचं नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे.
निकाल लागल्यानंतर या संकेतस्थळावर दहावी आणि बारावीच्या निकालाची लिंक उपलब्ध करून दिली जाईल. या लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक म्हणजेच सीट क्रमांक आणि विद्यार्थ्यांचे आईचे नाव टाकावे लागेल. यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसणार आहे.
दहावीचा निकाल लिंक
१. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org